पावसाळ्यात बेफिकिरीने अडचणी वाढू देऊ नका

Sandyanand    02-Jul-2020
Total Views |

rainy_1  H x W:


दैनंदिन जीवनात काही कामांकडे दुर्लक्ष केल्यास पावसाळ्यात अडचणी वाढू शकतात. यामध्ये काही अशीही आहेत जी विचार न करता झटपट केली जातात तर काहींकडे दुर्लक्ष केले जाते. पण संकट सांगून थोडेच येते. जर सावध राहून ते केले तर अनेक त्रास असेच टाळू शकाल. 


पहिले तपासा नंतर वापरा : पावसाळ्यात किडे इ. येणे सामान्य गोष्ट आहे. स्कूटी-बाइक घरी वा इतरत्र उभी करीत असाल तर वापरण्यापूर्वी प्रथम चहुबाजुंनी तपासून पाहा. पुढे लावलेली जाळी, शेजारी टांगलेली बॅग, मोकळी डिकीही व्यवस्थित चेक करा. बाइकच्या सायलेन्सरजवळ कोणतीही बॅग टांगू नका. जर टांगली असेल तर ती सायलेन्सरला लागत नाही ना ते पाहा. हेल्मेट घालण्यापूर्वी आतून नीट तपासून पाहा. तसेच कारच्या काचा नेहमी पूर्णपणे बंद करूनच जा. त्यात बसताना चाके नीट तपासा. 

वापरापूर्वीच पाहून घ्या : सकाळी घराबाहेर पडताना बूट उलटे करून झटकून नंतरच घालावेत. कदाचित त्यामध्ये एखादा किडा जाऊन बसलेला असू शकतो. तसेच खुंटीवर टांगलेले कपडे वा टॉवेल काढून सरळ वापरू नका. ते एकदोनदा झटकून व्यवस्थित पाहून घ्या. त्यात कोळी वा पाल बसलेली असू शकते. तेच बाल्कनीत वा अंगणात टांगलेले कपडेही झटकूनच ठेवा. 

किचन साफ ठेवा : जर आपण किचनची सफाई उद्यावर ढकलत असाल तर पावसाळ्यात असे करू नका. किचनमध्ये कुकटॉप वा ओट्यावर सांडलेले मसाले, भाज्या वा इतर अन्नकण असल्यास भुंगे, मुंग्या वा झुरळे येऊ शकतात. किचनचा वापर केल्यानंतर ओटा व्यवस्थित डेटॉलने साफ करा. याशिवाय खाद्यपदार्थ झाकून ठेवा. जर जग वा ग्लासमध्ये ठेवलेले पाणी जास्त वेळ उघडे ठेवले असेल तर ते कितीही स्वच्छ असले तरी पुन्हा वापरू नका. ते न पाहता पिऊ नका. 

घराबाहेर ठेवा डस्टबिन : बहुधा डस्टबिन किचनमध्ये ठेवले जाते. पावसाळ्यात त्यात पडलेल्या कचऱ्यात माशा घोंगावतात. त्यामुळे किचन आजारांचे घर बनू शकते. शक्यतो या दिवसांत झाकलेले डस्टबिनच ठेवा. घरात पोछा करताना डेटॉल वा मीठ वापरा. जास्त कचरा साठवणे टाळा. ओला कचरा त्वरित हटवा. त्यावर माशा लवकर बसतात. खूप गरजेचे नसेल तर डस्टबिन बाल्कनीत वा अंगणात ठेवा.

पाहून पारखून घ्या औषधे : डॉक्टरांच्या चिठ्ठीनुसारच औषधे खरेदी केली तरी ती चिठ्ठीप्रमाणे आहेत का, हे पाहिले जात नाही. जेव्हा औषधे खरेदी कराल तेव्हा नाव आणि एक्स्पायरी डेट अवश्य तपासून पाहा. स्प्रे व सिरपच्या बाटल्या एकत्र ठेवू नका.