वृश्चिक

19 Jul 2020 12:34:38

dvf _1  H x W:  
 
 
या आठवड्यात तुम्हाला जास्त विचार करून काम करण्याची गरज नाही. आपल्या समोर जे जे काम येत जाईल ते ते तुम्ही तुमच्या पद्धतीने करा. नव्या कामातून फायदा होण्याचा योग आहे. तुम्ही उत्पन्नाच्या इतर स्रोतांविषयी विचार करून त्यावर काम कराल. यश नक्की मिळेल.
 
नोकरी/व्यवसाय : या आठवड्यात प्रोफेशनल आघाडीवर पैसा खर्च होईल पण कामांचे उत्तम फळ मिळाल्यामुळे आत्मविश्वास वाढेल. कम्युनिकेशन आधारित कामांमध्ये विशेषकरून तुमच्या शब्दांत स्पष्टपणा राखाल. उत्तरार्धात विदेशी वा दूरच्या कामातून फायदा मिळू शकतो.
नातीगोती : या आठवड्यात प्रेमी युगलांच्या संबंधामध्ये अहंकार आड येऊ शकतो. जे पूर्वीपासून संबंधात आहेत त्यांना अनपेक्षित बदलाची श्नयता आहे. त्यामुळे ते गोंधळलेले राहतील. तुमच्यात एखाद्याविषयी खास आकर्षण असेल. पण संबंध योग्य मार्गावर नेण्यात अडचण राहील.
आरोग्य : या आठवड्यात तुमचे आरोग्य सुखकारक असेल, पण सुरुवातीचे दोन दिवस पाठदुखीचा त्रास राहील. तसेच रक्ताभिसरणाबाबत समस्या, स्नायूंमध्ये वेदना वा डोळ्यांची जळजळ, चक्कर, अ‍ॅलर्जी अशा समस्या असतील तर त्यावरही लक्ष द्यायला हवे. उत्तरार्धात तुम्ही फिट आणि फाइन राहाल.
शुभदिनांक : १९, २२, २३
शुभरंग : पिवळा, लाल, गुलाबी
शुभवार : रविवार, सोमवार, मंगळवार
दक्षता : या आठवड्यात चुकीच्या व्यक्तींच्या संपर्कात येणे टाळावे. अन्यथा संकटात सापडू शकता.
उपाय : या आठवड्यात शिवशंकराचा आर्शीर्वाद मिळवण्यासाठी पंचामृताने शिवqलगावर अभिषेक करावा.
 
Powered By Sangraha 9.0