वृषभ

Sandyanand    19-Jul-2020
Total Views |
 
dvf _1  H x W:
 
 
 
या आठवड्यात आर्थिक आधार असल्यामुळे तुम्ही मनोरंजनाच्या जगाकडे वळाल. सकारात्मक विचारांसोबत काम कराल. कामात यश मिळाल्यामुळे तुम्ही अत्यंत उत्साही राहाल. सहकाऱ्यांचे सहकाङ्र्म लाभेल. मोठी गुंतवणूक करणे टाळावे. बाहेरील व्यक्तीला उधार देऊ नये.
 
नोकरी/व्यवसाय : या आठवड्यात व्यावसायिक कामांमध्ये तुम्ही स्थिरतेने पुढे जाल. शेअर बाजार, सट्टा, जुगार यापासून दूर राहावे अन्यथा मोठे नुकसान होऊ शकते. सध्या संभाषणाद्वारे करावयाच्या कामात तुम्हाला शब्द आणि बोलणे अत्यंत सौम्य राखणे शिकण्याची गरज आहे.
नातीगोती : या आठवड्यात जुने संबंध तोडून नवे संबंध सुरू करताना नात्यांमध्ये तणाव राहण्याची श्नयता आहे. सध्या तुम्ही वयाने तुमच्यापेक्षा मोठ्या व्यक्तीकडे आकर्षित होण्याची जास्त शक्यता  आहे. प्रेम व्यक्त करताना स्वत:च्या बोलण्यावर नियंत्रण ठेवावे लागेल. विचारपूर्वक पुढे जा.
आरोग्य : आठवड्याच्या सुरुवातीला आरोग्यात स्फूर्ती आणि जोम असेल तर शेवटी थोडा थकवा आणि सुस्ती जाणवेल. विशेषत: तुम्ही संततीविषयी चिंतातूर असाल. जर मधुमेह, स्थूलतेसोबत यासंबंधित समस्या व कंबरदुखी वा लीव्हरच्या समस्या असतील आत्ताच त्याकडे लक्ष द्यावे.
शुभदिनांक : २०, २१, २५ शुभरंग : भुरा, हिरवा, काळा
शुभवार : रविवार, बुधवार, शनिवार
दक्षता : या आठवड्यात कमाई आणि खर्चाबाबत खूप दूरचा विचार करू नये.
उपाय : या आठवड्यात शिवपूजनाच्या वेळी दही, साखर, शुभ्र चंदन इ. वाहावे. तसेच पांढऱ्या फुलांचा वापर करावा.