या आठवड्यात तुम्ही उत्पन्नाच्या नव्या स्रोतांविषयी विचार कराल. तुमचे उधारी वसूल करण्याचे काम पूर्ण होईल. कार्यक्षेत्रात तुम्ही मोठ्या उत्साहाने काम कराल पण जसजसा आठवडा संपू लागेल तुमच्या कामाविषयीचा उत्साह कमी होत जाईल. अशावेळी ऊर्जा राखणे उत्तम ठरेल.
नोकरी/व्यवसाय : या आठवड्यात प्रोफेशनल बाबींमध्ये उत्तम परफॉर्मन्स द्याल, परंतु विरोधक आणि प्रतिस्पर्धकांपासून सावध राहावे. ते तुमच्यावर कुरघोडी करण्याचा प्रयत्न करतील. भागीदारीत सुरुवातीचा काळ उत्तम असेल. अखेरच्या काळात तुमचा वेग मंदावेल. कामात थोडा ब्रेक घ्यावासा वाटेल.
नातीगोती : या आठवड्यात तुमचे प्रेमसंबंध उत्तम राहतील. तसेच दांपत्यसुखही उत्तम लाभेल. तशी तुम्ही तुमच्या रागावर ताबा ठेवण्याची तयारी राखायला हवी. अनावश्यक भांडणे टाळावीत. तुमच्यामध्ये कम्युनिकेशन कमी झाल्याचे जाणवेल. रोमँटिक मूडमध्ये तुमचे प्रेम व्यक्त करा.
आरोग्य : या आठवड्याच्या उत्तम सुरुवातीनंतर दुसऱ्याच दिवशी तुम्हाला थोडी अस्वस्थता जाणवेल. कोणतीही मोठी समस्या नसेल पण आळस आणि वातावरणाचा परिणाम तुमच्या शरीरावर दिसून येईल. नंतर तुमच्या स्थितीत स्पष्ट सुधारणा घडून येईल व तुम्ही पुन्हा उत्साही व उल्हसित व्हाल.
शुभदिनांक : २०, २१, २५
शुभरंग : भुरा, नारंगी, काळा
शुभवार : रविवार, बुधवार, शनिवार
दक्षता : या आठवड्यात कौटुंबिक जीवनात थोडे मतभेद व तणाव उत्पन्न होऊ शकतो. त्यामुळे शांत व संयमित राहावे.
उपाय : या आठवड्यात शिवशंकराला दही, मध आणि अत्तर चढवणे अत्यंत लाभदायक मानले जाते.