या आठवड्यात तुम्ही तुमच्या कामाकडे जास्त लक्ष देण्याची गरज आहे. यश मिळवण्यासाठी काही नवे करण्याचा प्रयत्न करावा. तुमच्या कामाविषयी सचोटी आणि उत्साह दाखवावा. तुमचा राग, आवेश आणि नकारात्मक विचार यामुळे तुमच्या माणसांसोबतचे संबंध बिघडणार नाहीत याची दक्षता घ्या.
नोकरी/व्यवसाय : हा आठवडा नोकरदार लोकांसाठी वरिष्ठांशी तणावात जाणारा असेल याकडे लक्ष देण्याची गरज आहे. अखेरच्या दिवशी महत्त्वाचा निर्णय घेणे टाळावे. बौद्धिक प्रतिभेच्या कामात असणाऱ्यांनी जास्त सावध राहवे. सरकारी व कायदेशीर कामांतही लक्ष ठेवावे.
नातीगोती : या आठवड्यात तुमचा अहंकार, क्रोध आणि आवेश वाढणार नाही यावर जास्त लक्ष द्यावे. विवाहोत्सुक जातक स्वत:साठी मनपसंत जोडीदार निवडू शकतात. अखेरच्या दिवशी दांपत्य नात्यात थोडा फरक पडू शकतो पण आपण एकंदरीतच एकमेकांसोबत राहणे पसंत कराल.
आरोग्य : या आठवड्यात तब्बेतीत चढ-उतार राहू शकतो. तुम्हाला मोसमी आजार होण्याची खूप श्नयता आहे. पचनप्रणाली, चेतनेसंबंधित आजार, जीभेचा त्रास, हातांच्या सांध्यांचे दुखणे या समस्या असणाऱ्यांनी उपचाराकडे जास्त लक्ष द्यावे. अखेरच्या दोन दिवसांत सुस्ती व थकवा जाणवेल.
शुभदिनांक : २०, २१, २५ शुभरंग : पिवळा, लाल, पांढरा
शुभवार :रविवार, सोमवार, मंगळवार
दक्षता : या आठवड्यात मोठे निर्णय घेणे तसेच गुंतवणूक करणे टाळावे. योग्य दिशेने विचार करावेत.
उपाय : या आठवड्यात शिवपूजनात गूळ-पाण्याने शिवशंकराला अभिषेक करावा.