मिथुन

Sandyanand    19-Jul-2020
Total Views |

dvf _1  H x W:  
 
 
या आठवड्यात तुमची सकारात्मक बाजू भक्कम राहील. भावनेच्या भरात कोणताही निर्णय घेऊ नये. कार्यक्षेत्रातील  स्वत:ची स्थिती मजबूत करण्याविषयी विचार करावा. कामामध्ये थोडे नावीन्य आणण्याचा प्रयत्न करावा. त्यासोबतच नवनवीन प्रयोग करीत राहावेत.
 
नोकरी/व्यवसाय : या आठवड्यात नोकरदारांच्या कामात, जबाबदाऱ्यांमध्ये आणि काङ्र्मक्षेत्रातही बदल घडून येण्याची शक्यता  हे. स्पर्धक तुम्हाला मागे टाकण्याचा प्रयत्न करतील, पण त्यांची कोणतीही चाल यशस्वी ठरणार नाही. वरिष्ठांचे तुम्हाला सहकार्य  लाभेल.
नातीगोती : या आठवड्यात तुम्हाला एखाद्या विशिष्ट व्यक्तीविषयी आकर्षण राहील. तुमची तिच्याशी भेटही होईल. विवाहितांना संबंध अपेक्षेपेक्षा संथ असल्याचे जाणवेल. तुम्ही श्नय तेवढा जोडीदाराला खूश ठेवण्याचा प्रयत्न कराल. सुरुवातीला सार्वजनिक कामामुळे प्रियव्यक्तीला कमी भेटाल.
आरोग्य : या आठवड्यात तब्बेतीची जास्त काळजी घेण्याचा सल्ला दिला जात आहे. विशेषत: प्रवासात अपघात होणार नाही याची दक्षता घ्या. तसेच कोणत्याही साध्या समस्येतही स्वत: उपचार करण्यापेक्षा डॉ्नटरांचा सल्ला घ्यावा. कोणतीही बेपर्वाई तुम्हाला अडचणीत आणू शकते.
शुभदिनांक : २०, २१,२६
शुभरंग : भुरा, नारंगी, काळा
शुभवार : रविवार, बुधवार, शनिवार
दक्षता : या आठवड्यात कुटुंबीयांकडून आर्थिक मदत मिळू शकते पण कोणतेही बेकायदेशीर देणे-घेणे टाळावे.
उपाय : या आठवड्यात शिवपूजेत उसाच्या रसाने शिवशंकराचा अभिषेक करायला हवा. या उपायाने तुमच्या मनोकामना पूर्ण होतील.