मेष

19 Jul 2020 12:34:34
 
dvf _1  H x W:
 
 
या आठवड्यात तुम्ही प्रोफेशनल आघाडीवर उत्साहाने आणि जोमाने पुढे जाल. सामाजिक प्रतिष्ठा मिळाल्यामुळे सुखसमाधान अनुभवाल. तुम्ही कोणत्याही महत्त्वाच्या कामाची चर्चा करताना नम्र राहायला हवे. कठीण विषयांबाबत तुम्ही गंभीर असाल. तुमच्या शक्तीचा योग्य वापर कराल तर यश मिळवू शकाल.
 
नोकरी/व्यवसाय : या आठवड्यात एखाद्याशी रागाने वागण्याची, प्रतिस्पर्ध्यांकडे  दुर्लक्ष करण्याची आणि आततायीपणे निर्णय घेण्याची शक्यता  असल्यामुळे आत्मसंयमाने आणि धैर्याने  वागाल तर फायदा होईल. सध्या एखाद्या कामात मोठा बदल करणार असाल तर सल्ला घेऊनच तो करावा.
 
नातीगोती : या आठवड्यात तुमच्या नात्यांमध्ये जास्त जवळीक राहील, परंतु तुम्ही तुमच्या अति उतावीळपणावर आणि आवेशावर अंकुश ठेवायला हवा. त्यामुळे नात्यांचे सुख उत्तम मिळेल. अन्यथा साध्या क्षुल्लक गोष्टींमुळेही मोठा वाद होऊ शकतो. प्रेमात संथपणे पण स्थिरपणे पुढे जाल.
 
आरोग्य : या आठवड्यात तुमचे आरोग्य उत्तम राहील. तुमच्यावर ग्रहांचा कोणत्याही प्रकारचा विपरित परिणाम होणार नाही. तरीही हवामान बदलाचा तुमच्यावर कोणताही परिणाम होऊ नये यासाठी लक्ष ठेवावे. विशेषकरून छाती, फुफ्फुसे आणि श्वासनलिकेविषयी समस्या असल्यास त्वरित उपचार घ्यावेत.
 
शुभदिनांक : १९, २२, २३
शुभरंग : पिवळा, लाल, शुभ्र
 शुभवार : रविवार, सोमवार, मंगळवार
दक्षता : या आठवड्यात कोणताही एकत्रित निर्णय घेण्यात वा करार करण्यात उतावीळपणा करू नये.
उपाय : या आठवड्यात शिवशंकराला गूळ-पाण्याचा अभिषेक करावा. हा उपाय तुमच्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे.
 
Powered By Sangraha 9.0