या आठवड्यात तुमच्या कामामध्ये बदल होताना दिसत आहे. आर्थिक दृष्ट्या सुरुवातीचा काळ तणावाचा असेल पण कमाईसाठी तुम्ही नवनवीन प्रयत्न कराल. यामध्ये यश मिळण्याची खूप श्नयता आहे. उत्तम व्यक्तींशी भेट घडून येईल. स्वादिष्ट जेवणाचा आस्वाद घेऊ शकाल. 
 
नोकरी/व्यवसाय : या आठवड्यात तुम्ही काही नवा विचार कराल आणि तुम्हाला उत्तम संधीही मिळत राहील. नवा उद्योग सुरू करण्यासाठी इतरांचे ऐकण्याऐवजी स्वत:च स्वत:च्या परिस्थितीचे विश्लेषण करून पुढे व्हावे. दूरच्या आणि परदेशी व्यवहारात सध्या जास्त अनुकूलता असेल . 
 
नातीगोती : या आठवड्यात तुम्हाला संबंधात मजा वाटणार नाही कारण तुमची मानसिक अस्वस्थता व चंचलता खूप जास्त राहील. तसे यानंतरच्या काळात तुमच्या मनामध्ये रोमँटिक विचार जास्त राहतील. आठवड्याच्या अखेरच्या दिवशी प्रियपात्रासोबत फिरण्याची योजना बनवाल. यात एखादी अडचणही येऊ शकते. 
 
आरोग्य : या आठवड्यात मोसमी आजार, सर्दी, कफ, श्वास घ्यायला त्रास इ.ची श्नयता आहे. अखेरच्या दोन दिवसांत विशेष करून प्रवासात मार लागण्यापासून सावध राहावे. कोणत्याही कामात आततायीपणा व जास्त जोखीम पत्करणे टाळावे. या काळात मज्जासंस्थेविषयक त्रास संभवतो. 
शुभदिनांक : १९, २२, २३ 
शुभरंग : पिवळा, लाल, पांढरा 
शुभवार : रविवार, सोमवार, मंगळवार 
दक्षता : या दिवसांत अनावश्यक ताण टाळण्यासाठी पुरेसा आराम करावा. जास्त चिंता करू नये 
उपाय : या आठवड्यात शिवशंकराचा आशीर्वाद मिळवण्यासाठी केशरयुक्त दुघाने शिवलिंगावर अभिषेक करावा.