मकर

19 Jul 2020 12:34:39

dvf _1  H x W:  
 
 
या आठवड्यात तुम्ही प्रोफेशनल आघाडीवर खूप सक्रिय राहणार आहात. पूर्वीपासून तयार योजना आत्ता अमलात आणू शकाल. कुटुंबीयांसोबतचे व प्रियव्यक्तीसोबतच्या संबंधात तुम्हाला समाधान लाभणार नाही. सध्या मौजमस्ती व ल्नझरी लाइफस्टाइलवर कमी खर्च कराल.
 
नोकरी/व्यवसाय : या आठवड्याची सुरुवात व्यावसायिक आघाडीवर जरी चांगली असली तरी दीर्घकालीन विचार कराल तर अद्याप खूप सावध राहायला हवे. विशेषत: भागीदारीत व नव्या करारात सावध राहावे. कामकाजात रागावर नियंत्रण ठेवावे. कल्पकतेच्या कामात थोडा त्रास संभवतो.
 
नातीगोती : या आठवड्यात दांपत्यजीवनात एखाद्या गोष्टीवरून वाद होऊ देऊ नये. कारण त्यामुळे भांडण व संशय वाढू शकतो. प्रेमसंबंधासाठी तसा उत्तम आठवडा आहे. तरीही तुम्ही या आठवड्यात नम्रपणे वागणे अत्यंत आवश्यक आहे. नात्यांमध्ये मोकळेपणा असावा.
 
आरोग्य : या आठवड्यात तुमचे आरोग्य एकंदरीत पाहता उत्तम राहील. तुमच्यामध्ये उत्साह आणि शक्ती असल्यामुळे प्रोफेशनल बाबींमध्ये जास्त लक्ष देऊ शकाल, परंतु आठवड्याच्या मधल्या काळात पोटासंबंधित तक्रारी, चक्कर येणे, कपाळ वा हनुवटीवर मार लागणे तसेच अ‍ॅसिडिटी संभवते.
 
शुभदिनांक : २०, २१, २५
शुभरंग : भुरा, नारंगी, काळा
शुभवार : बुधवार, शुक्रवार, शनिवार
दक्षता : दरवेळी तुम्ही ठेच लागल्यानंतर सावरता. या आठवड्यात यापासून सावध राहण्याचा प्रयत्न करावा.
उपाय : या आठवड्यात शिवशंकराचा आशीर्वाद मिळवण्यासाठी शहाळ्याच्या पाण्याने शिवqलगावर अभिषेक करावा.
Powered By Sangraha 9.0