कर्क

Sandyanand    19-Jul-2020
Total Views |

dvf _1  H x W:  
 
या आठवड्यात तुमच्या मनात धर्माविषयी श्रद्धा वाढेल. तसेच जनकल्याणाच्या कामात भाग घ्यावासा वाटेल तसेच दान करण्याचीही इच्छा होईल. कार्यक्षेत्रात कामाचे दडपण जास्त राहू नये यासाठी काम करण्याची योजना बनवून नंतरच कामाला सुरुवात करावी.
 
नोकरी/व्यवसाय : या आठवड्यात तुम्ही कुशलतेने व्यापार कराल व त्याचा तुम्हाला फायदाही मिळेल, पण भागीदारीच्या कामात वा संयुक्त उद्योग, करार इ.त अडथळे संभवतात. भागीदारीत पूर्णपणे बदलाची शक्यता  आहे. नोकरदारांनी इतरांवर विसंबण्याऐवजी स्वबळावर काम करावे.
नातीगोती : या आठवड्यात वैवाहिक नात्याकडे विशेष लक्ष देण्याची गरज आहे. कारण आपसातील विश्वासाचे वारंवार परीक्षण होऊ शकते. दांपत्यजीवनात जोडीदारात थोडा अहंकार असेल. सध्या प्रेमसंबंधात असणाऱ्यांची सामान्य स्थिती राहील. प्रेम व्यक्त करण्यात थोडा अडथळा येईल.
आरोग्य : या आठवड्यात बद्धकोष्ठतेची समस्या, डोळ्यांमध्ये जळजळ, कंबरदुखी, पित्ताचा त्रास होण्याची श्नयता वाढू शकते. सध्या श्नयतो तळकट आणि मसालेदार पदार्थ खाणे टाळावे. ज्यांना दात, खांदे, मान, नाक, कान यासंबंधी जुना त्रास असेल त्यांनी अधिक लक्ष देण्याची गरज आहे.
शुभदिनांक : १९, २२, २३
शुभरंग : पिवळा, लाल, मरून
शुभवार : रविवार, सोमवार, मंगळवार
दक्षता : या आठवड्यात तणावापासून दूर राहावे. एखादे व्यसन असल्यास सोडावे. अन्यथा समस्या आणखी वाढेल.
उपाय : या आठवड्यात शिवपूजा करताना तूप वाहायला हवे. हा उपाय श्रद्धेने करायला हवा