या आठवड्यात तुम्हाला कार्यक्षेत्रात थोडे धीराने काम करावे लागेल. बोलण्यावर ताबा ठेवावा. तसेच स्वत:च्या रागावर आणि आवेशावर नियंत्रण ठेवावे. सध्या शेजाऱ्यांशी वा शेजारी बसणाऱ्या सहकर्मचाऱ्यांशी मतभेद किंवा भांडण होण्याची शक्यता दिसत आहे.
नोकरी/व्यवसाय : प्रोफेशनल व्यक्तींसाठी शुभफलदायी काळ असणारा आठवडा आहे. सुरुवातीला नोकरदारांसाठी उज्ज्वल संधीचा काळ आहे. तुम्ही उत्साहाने पुढे जात राहाल. सुरूवातीचा काळ भागीदारीच्या कामांसाठी अनुकूल असेल. प्रवासासंबंधित कामात थोडी मंदी असू शकते.
नातीगोती : या आठवड्यात तुम्ही कामकाजात जास्त व्यस्त राहाल, पण दुसऱ्या दिवशी तुमच्यात परस्परातील आकर्षण वाढेल आणि एकमेकांसोबत छान वेळ घालवाल. तुमच्यातील विशिष्ट व्यक्तीविषयीचे आकर्षण थोडेसे कमी होईल, पण अखेरच्या दोन दिवसांत जवळीक वाढवण्याचा प्रयत्न कराल.
आरोग्य : या आठवड्यात तब्बेतीकडे विशेष लक्ष देण्याची गरज आहे. विशेषकरून पोटातील जळजळ, पाठीच्या कण्यात वेदना, पोटात गॅस, पित्ताचा त्रास, मानसिक अस्वस्थता इ. त्रास होण्याची शक्यता आहे. प्रवासात आणि ड्रायव्हिंग करताना निष्काळजी राहाल तर मार लागू शकतो.
शुभदिनांक : २०, २१, २५ शुभरंग : भुरा, नारंगी, काळा
शुभवार : रविवार, बुधवार, शनिवार
दक्षता : या आठवड्यात जोडीदाराच्या तब्बेतीविषयी बेफिकीर राहू नये.
उपाय : शिवशंकराला प्रसन्न करण्यासाठी भांग आणि पान वाहावे. यामुळे भोलेनाथाचा आशीर्वाद मिळेल.