या आठवड्यात तुम्ही भविष्याबाबत उत्तम प्लॅनिंग करू शकाल. लक्ष्मीमातेच्या कृपेने उत्पन्नात वाढ होईल. कलाकार व कारागीरांना त्यांच्या कलेचे प्रदर्शन करण्याची संधी मिळेल व त्याची कदर होईल. नकारात्मक विचारांपासून दूर राहावे.
नोकरी/व्यवसाय : या आठवड्यात तुम्ही नोकरीत काही नवे करण्यासाठी उत्साहाने पुढे जाल. तुमच्यातील उत्साह वाढेल. ग्रहांची स्थिती पाहता तुम्हाला तुमच्या वरिष्ठांचे सहकाङ्र्म कमी लाभेल. त्यांच्यासोबत मतभेद होणार नाहीत याची काळजी घ्यावी. प्रतिस्पर्धकांपासून जपावे.
नातीगोती : या आठवड्यात तुम्ही तुमच्या प्रोफेशनल कामात जास्त व्यस्त राहिल्यामुळे प्रेमसंबंधात तुमचा उत्साह कमी असेल. त्यामुळे तुम्ही तुमच्या जोडीदाराला कमी वेळ देऊ शकाल. यातूनही वेळ काढून तुम्ही तुमचे प्रेम व्यक्त करण्यात यशस्वी व्हाल. वडीलधाऱ्यांसोबत आदराने वागावे.
आरोग्य : या आठवड्यात तुम्हाला तुमचे आरोग्य जपण्याची गरज आहे. तुमची थोडीशी बेपर्वाई तब्बेतीविषयी गंभीर समस्या निर्माण करू शकते. विशेषकरून शेवटच्या दिवशी लक्ष ठेवावे लागेल. स्थूलता, डोळ्यांची जळजळ, कंबरदुखी अॅसिडिटी, पित्त, त्वचेच्या समस्या जागरण असे त्रास संभवतात.
शुभदिनांक : १९, २२, २३
शुभरंग : पिवळा, लाल, पांढरा
शुभवार : रविवार, सोमवार, मंगळवार
दक्षता : या आठवड्यात सरकारी आणि कायदेशीर व्यवहारात कोणावरही डोळे झाकून विश्वास ठेवू नये.
उपाय : या आठवड्यात हळदयुक्त दुधाने शिवशंकराला अभिषेक करावा. हा उपाय तुमच्यासाठी अत्यंत लाभदायक आहे.