केवळ गोरा रंग म्हणजे श्रेष्ठत्व आणि बुद्धिमत्ता नाही...

18 Jul 2020 13:26:39
 
 
 
ब्रिटिशांच्या राजवटीमुळे भारतीयांमध्ये रंगाबाबत न्यूनगंड.
 
गोऱ्या रंगाच्या आकर्षणामुळे भारतात येतात रंगभेदाचे अनुभव.
 
रंगभेदाविरुद्ध 'डार्क इज ब्युटिफुल' चळवळ उभी राहते आहे.
 
 
 
 गोऱ्या रंगासाठी...
 
२१,४००० कोटी रुपये चीनमधील स्किन केअर उत्पादनांची बाजारपेठ ही जगात सर्वांत मोठी आहे.
५८,००० कोटी रुपये भारतातील स्किन केअर उत्पादनांची बाजारपेठ
७३,००० कोटी रुपये या उत्पादनांची भारतातील २०२३पर्यंतची बाजारपेठ
 ७.९ टक्के भारतातील स्किन केअर उत्पादनांच्या बाजारपेठेतील वार्षिक वाढ
 
 
रंगाचा मुद्दा आल्यावर गोरेपण सर्वांवर मात करते. गोऱ्या रंगाच्या आकर्षणामुळे सावळ्या व्यक्तींना न्यूनगंड येतो. रंगभेदाचा अनुभव काहींना लहानपणापासूनच आल्यामुळे कदाचित त्यांना गोरे व्हावेसे वाटत असावे. पण आता मडार्क इज ब्युटिफुलफ आणि 'ब्लॅक लाइव्हज मॅटर'सारख्या चळवळी या रंगभेदाविरुद्ध उभ्या ठाकल्या आहेत. मात्र, भारतीयांमधील गोरेपणाचे आकर्षण एवढ्यात कमी होण्याची चिन्हे दिसत नाहीत. रंगाचा आणि प्रगतीचा काहीही संबंध नसतो
 
.कोणाला कशाचा न्यूनगंड असेल हे सांगता येत नाही. भारतीयांना सध्या त्यांच्या त्वचेचा रंग त्रासदायक वाटायला लागला आहे. आपण सुंदर दिसावे, छाप पडावी असे वाटणे नैसर्गिक आहे. व्यक्तिमत्त्वात बदल करून ते साध्यही करता येते. बाजारात त्यासाठी असंख्य सुविधा उपलब्ध आहेत. पण त्वचेच्या रंगाचे काय? भरपूर सूर्यप्रकाशाची  देणगी लाभलेल्या आपल्या देशात माणसांच्या त्वचेत विविध रंग असले, तरी गव्हाळ ते सावळा वर्ण जास्त दिसतो. गोरे लोकसुद्धा आहेत. त्वचेचा रंग येतो गुणसूत्रांमधून आणि आपण राहत असलेल्या प्रदेशाच्या हवामानातून. दिवसभर उन्हात फिरणारी व्यक्ती रापलेली, सावळ्या त्वचेची असते, तर घरात जास्त राहणारी, थंड प्रदेशातील व्यक्ती गोरी असते. पण तसा काही ठाम निकष नाही. सध्या मात्र भारतीयांना गोरे होण्याचे जणू वेडच लागले आहे. विशेषत: विवाहविषयक जाहिरातींमध्ये हे प्रकर्षाने दिसून येते. मगोऱ्या, सुंदर मुलीसाठी वर हवाफ किंवा 'उच्चशिक्षित मुलासाठी गोरी, सुंदर वधू हवी' असे वा्नय या जहिरातींमध्ये हमखास दिसेल. प्रश्न हा आहे, की रंगाबाबत आपण एवढे आग्रही का? सौन्देर्याच्या आपल्या निकषांत गोरेपणाला एवढे महत्त्व का? भारतासारख्या प्रचंड देशात हवामानाच्या वैविध्यामुळे गोरे, सावळे, गव्हाळ आणि काळे लोकसुद्धा आहेत. पण त्वचेच्या रंगाचा सौंदर्याबरोबर  संबंध? गोरी व्यक्ती सुंदरच असते हे आपण का समजतो? मुळात भारतीयांमध्ये गोरा रंग अल्प प्रमाणात दिसतो.
 
मुख्यत्वे सावळे किंवा गव्हाळ लोक जास्त दिसतात. हे सगळे असूनही गोऱ्या रंगाचे एवढे आकर्षण का असावे? या प्रश्नांची उत्तरे इतिहासात शोधावी लागतात. ब्रिटिशांनी भारतावर दीडशे वर्षे राज्य केले. ते गोरे होते. त्यामुळे गोरे म्हणजे राज्यकर्ते आणि श्रेष्ठ अशी न्यूनगंडात्मक भावना भारतीय समाजात रूजली. त्यातून गोऱ्या रंगाचे आकर्षण वाढायला लागले आणि नंतर जाहिरातींनी त्याला खतपाणी घातले. गोरेपणा म्हणजे सगळे चांगले असा समज त्यातून वाढला. जाहिराती करणारे (स्त्री-पुरुष) सहसा गोऱ्या रंगाचेच असतात. त्यामुळे जे गोऱ्या रंगाचे आहेत ते यशस्वी, श्रेष्ठ आणि सुंदरसुद्धा असल्याची भ्रामक समजून निर्माण झाली. ही समजूत दूर करावयाची असेल, तर सावळ्या आणि कृष्णवर्ण असलेल्या व्यक्तींना घेऊन जाहिराती करायला हव्यात. तेही यशस्वी असतातच ना? पण त्याचा अतिरेकही नको. नाहीतर सध्या गोरेपणाबाबत असलेली भावना सावळ्या रंगाबाबत होऊन त्याचे आकर्षण वाढेल! त्वचेच्या रंगावरून सौंदर्याचे  निकष ठरविणे प्रथम बंद करायला हवे. रंगभेदाच्या दुनियेला बदलणे सोपे नसले तरी त्यासाठी प्रयत्न करायला हवेतच. कोणत्याही चांगल्या प्रथेचा प्रारंभ आपल्यापासूनच करणे योग्य असते. प्रत्येकाने आपल्या कुटुंबापासून रंगभेद दूर करण्याला सुरुवात करावी. त्यातही लहान मुलांपासून प्रारंभ केला, तर फारच चांगले. कारण मुले निरागस असतात आणि आपण करू ते संस्कार ती लवकर आत्मसात करतात. मुलांच्या मनातून प्रथम रंगाचा निकष काढायला हवा. सौंदर्य  म्हणजे अन्य बऱ्याच गोष्टी असतात हे त्यांना सांगायला हवे. बुद्धिमत्ता म्हणजे सौंदर्य  किंवा चांगली वर्तणूक म्हणजेही सौंदर्य  हे मुलांना पटवून द्यावयास हवे.
 
सौंदर्य  म्हणजे त्वचेचा रंग हा समज त्यांच्या मनातून आधी काढून टाकायला हवा. त्यासाठी आधी आई-बाबांनी रंगाचा विचार मनातून हद्दपार करायला हवा. त्यासाठी मुलांचा रंग कसा आहे याचा उल्लेखसुद्धा करायला नको. मूल कोणत्याही रंगााचे असले, तरी ते निरोगी राहील, प्रगती करेल याकडे जास्त लक्ष द्यावयास हवे. मुळात माणूस निरोगी असला, तर तो कोणत्याही रंगाचा असाल, तरी सुंदरच दिसतो. पण काही वेळा आयांनाच त्यांच्या मुली गोऱ्या व्हायला हव्या असतात. मग त्यासाठी प्रयत्न सुरू होतात आणि तज्ज्ञांचे सल्ले घेतले जातात. आपले मूल सुंदर दिसावे अशी प्रत्येक आईची इच्छा असते. पण त्यासाठी एवढा अट्टहास कशाला हवा? त्यातून होईल काय, तर मुलगीही रंगाबाबत नकोएवढी जागरूक होऊन तिचे सगळे लक्ष त्वचेच्या रंगावर केंद्रीत होईल. तिच्या मैत्रिणींबरोबर ती तुलना करायला लागेल. हे अयोग्य आहे. त्वचेचा रंग कोणता असावा हे आपल्या हाती नसले, तरी आहे त्यात समाधानी राहणे सहज श्नय आहे. बाह्य सौंदर्यापेक्षा आंतरिक सौंदर्याकडे  जास्त लक्ष दिले, तर प्रगती वेगाने होते हे लक्षात ठेवावे. केवळ गोरा रंग म्हणजे ती व्यक्ती श्रेष्ठ, हुशार, बुद्धिमान आणि यशस्वी असते हा समज मोडीत काढण्यासाठी आणि रंगभेद दूर करण्यासाठी कविता इमॅन्युएल यांनी २००९पासून मडार्क इज ब्युटिफुलफ ही चळवळ सुरू केली. नंदिता दास आणि तनिष्ठा चटर्जी या दोन अभिनेत्रींनी या चळवळीला प्रथमपासून पाqठबा दिला आहे. भारतासह आज जगातील १८ देशांत ही चळवळ पोहोचली आहे. लोकांच्या मनातील रंगभेद दूर करणे हा या चळवळीचा उद्देश असून जाहिरातींचे स्वरूपही बदलायला हवे अशी या चळवळीची मागणी आहे. चळवळीत मडार्कफ असा उल्लेख केवळ संदर्भासाठी आहे. काळ्या रंगाची माणसेसुद्धा बुद्धिमान असतात, तीही प्रगती करतात हे स्पष्ट करण्याचा उद्देश त्यामागे असल्याचे कविता इमॅन्युएल सांगतात.
 
आंतरिक सौंदर्य  महत्त्वाचे - सौंदर्य  हे बघणाऱ्याच्या नजरेवर अवलंबून असते असे म्हणतात. दुर्दैवाने  बाह्य सौन्दार्यावरच  आपण आडाखे बांधत असतो. पण खरे महत्त्व आहे ते आंतरिक सौंदर्याला  त्याच्याशिवाय बाह्य सौंदर्याला अर्थ नसतो. शरीर, मन आणि आत्म्याच्या मिलाफातून आंतरिक सौंदर्य  वाढते. त्यासाठी योग, प्राणायाम आणि ध्यानधारणा हे मार्ग आहेत. आंतरिक शांतता लाभल्यावर सौंदर्य  खुलते. मग त्वचेचा रंग कोणता, याला काही महत्त्व उरत नाही.
Powered By Sangraha 9.0