ऑनलाइन किराणा बाजार २२ हजार कोटींच्या वर जाणार

17 Jul 2020 10:44:30
 
 
भारतातील ऑनलाइन किराणा बाजार नजीकच्या काळात २२ हजार कोटी रुपयांवर जाईल, असा अंदाज स्पेन्सर रिटेलचे अध्यक्ष संजीव गोएंका यांनी व्यक्त  केला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत ही वाढ ७६ ट्नके असेल. कोरोनाच्या साथीनंतर ग्राहकांचा ऑनलाइन किराणा खरेदी करण्याकडे कल वाढला असून, स्पेन्सरने नुकतेच म्हणजे जुलै २०१९ मध्ये नेचर बास्केट कंपनीचे अधिग्रहण केले आहे. याआधीच्या कालापेक्षा ग्राहकांचा जीवनावश्यक वस्तू ऑनलाइन घेण्याचा इरादा अधिक आहे, असेही गोएंका म्हणतात. ताजा माल घरपोच मिळावा, ही भावना वाढीस लागल्याने हा परिणाम दिसतो आहे. स्माटफोनधारकांची वाढती संख्या आणि विविध चॅनेलद्वारे मिळणारे खरेदीचे पङ्र्माय हेही त्यामागचे कारण आहे. याचा आम्हीही फायदा घेऊ, असे ते म्हणतात. फोन कॉल आधारित डिलिव्हरी, चॅट बॉट सेवा, व्हॉट्सअ‍ॅपद्वारे संदेश याचाही वापर कंपनी करते आहे.
Powered By Sangraha 9.0