प्लाझ्मादाते शोधताना सावध राहाव

16 Jul 2020 14:43:07
 
 
ऑनलाइन फसवणुकीबाबत सावधानतेचा गृहमंत्र्यांचा इशारा
 
कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी प्लाझ्माथेरपी उपयु्नत ठरते आहे; परंतु यासंदर्भातही फसवणूक होत असल्याच्या तक्रारी येत आहेत. त्यापासून सावध राहावे, असे आवाहन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केले आहे. डॉक्टरांची मते व निरीक्षणावरून मप्लाझ्माथेरपीफचा वापर सुरू करण्यात आला आहे. जास्तीत जास्त कोव्हिड रुग्णांना मदत करण्यासाठी विविध राज्ये व रुग्णालयांनी प्लाझ्मा बँक आणि प्लाझ्मा देणगी (डोनेशन) मोहीम सुरू केली आहे. प्लाझ्मा देणगीदाराच्या कमतरतेमुळे ही थेरपी महाग आहे. काही निवडक रुग्णालयांत ही उपचार पद्धती करण्यात येते. या परिस्थितीचा गैरफायदा घेत कोरोनातून बरे झालेले बेरोजगार तरुण आवश्यकतेनुसार थेट लोकांना प्लाझ्मा दान देताना आढळून आले आहेत.
 
प्लाझ्मादानासाठी कोव्हिडमधून बरे झाल्याचा वैद्यकीय अहवाल आणि प्लाझ्मादान देण्यास तंदुरुस्त असल्याचे प्रमाणपत्र आवश्यक आहे. गरजूंच्या बिकट परिस्थितीचा फायदा घेत त्यांना फसवण्याच्या उद्देशाने बनावट प्रमाणपत्रे तयार केली जात असल्याचेही निदर्शनास आल्याचे गृहमंत्र्यांनी सांगितले. सायबर गुन्हेगार यासाठी समाजमाध्यमांवर विविध यु्नत्या वापरत आहेत. डार्क वेब आणि बेकायदेशीर वाहिन्यांवर प्लाझ्मा विक्रीसंदर्भात फसवणूक होऊ शकते. त्याविरुद्ध कडक कारवाई केली जाईलच. तथापि संबंधितांनी या प्लाझ्माथेरपी उपचारांबाबत जागरूक राहावे. प्लाझ्मादाता ऑनलाईन शोधताना काळजी घ्यावी, अशी सूचनाही गृहमंत्र्यांनी केली आहे. तसेच, यासंदर्भात फसवणूक होत असेल, तर नजीकच्या पोलिस ठाण्यात कळवावे किंवा www. cybercrime.gov.in वर तक्रार नोंदवावी, असे आवाहनही त्यांनी केले आहे.
Powered By Sangraha 9.0