मुंबई सेन्ट्रल आगारातील विश्रामगृहात होणार कोरोना केंद्र

Sandyanand    16-Jul-2020
Total Views |
 
lhjgl _1  H x W
 
मुंबई आणि ठाणे विभागातील कोरोनाबाधित एसटी चालक आणि वाहकांवर होणार उपचार
 
एसटीच्या कोरोनाबाधित कर्मचाऱ्यांचा आकडा वाढत असल्याने एसटीने कोरोनाबाधित आणि त्यांच्या संपर्कात आलेल्या अन्य कर्मचाऱ्यांवर उपचारांसाठी मुंबई सेन्ट्रल आगारातील चालक-वाहकांच्या विश्रामगृहात कोरोना सेंटर उभारण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबई महापालिकेशी चर्चा करूनच याला अंतिम स्वरूप देण्यात येणार आहे. कामगारांची वाहतूक आणि अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी एसटीसेवा दिल्यानंतरही एप्रिल, मेपर्यंत एसटीचा एकही कर्मचारी कोरोनाबाधित नव्हता. मात्र, १५ जूननंतर कोरोनाबाधित कर्मचारी आढळून येऊ लागले. सध्याच्या घडीला राज्यात एसटीचे २७७ कर्मचारी कोरोनाबाधित असून, ६ जणांचा मृत्यू झाला आहे. यातील ११७ कर्मचारी उपचार घेऊन बरे झाले, तर १५४ कर्मचाऱ्यांवर उपचार सुरू आहेत.
 
मुंबई सेन्ट्रल, कुर्ला नेहरूनगर, परळ, पनवेल व उरण आगारात मिळून ९७ आणि ठाणे विभागाच्या खोपट, वंदना, कल्याण, भिवंडी व शहापूर आगारांत ११३ कर्मचारी आहेत. रोज सरासरी दोन ते चार कोरोनबाधित कर्मचाऱ्यांची भर पडत आहे. कोरोनाच्या धास्तीने एसटीचे अनेक कर्मचारी गावी निघून गेले आहेत. त्यामुळे मुंबईतच करोना सेंटर उभारण्याचा निर्णय एसटीने घेतला आहे. यासाठी पालिकेची मंजुरी आवश्यक असून, कोरोना सेंटरही त्यांच्याच देखरेखीखाली उभारले जाईल. हे सेंटर एसटीच्या मुंबई सेन्ट्रल आगारातील चालक-वाहकांच्या विश्रांतीगृहात (रेस्ट रूम) करण्याचा प्रस्ताव आहे. मुंबई महानगर परिसरातील कोरोनाबाधित चालक, वाहक, तसेच त्यांच्या संपर्कात आलेल्यांवर उपचार सुरू आहेत. तसेच, कोरोनाच्या धास्तीने अनेक चालक, वाहक आपापल्या गावी निघून गेले आहेत. त्यामुळे अत्यावश्यक कर्मचाऱ्यांसाठीची एसटीसेवा ठप्प होऊ नये, म्हणून राज्यातील अन्य आगारांतून चालक- वाहकांना बोलावण्यात आले आह