योग्य आहार, व्यायामाने मेंदू राहतो कार्यक्षम

Sandyanand    16-Jul-2020
Total Views |
 
lhjgl _1  H x W
 
 
ट्रेडमिल, योगासने, चालणे आणि ध्यानधारणेमुळे मेंदू राहतो तरतरीत
 
द्रवरूप पदार्थ आणि फळे, पालेभाज्या आहारात हव्यातच
 
सॉफ्ट ड्रिंक्स, मिठाई टाळा; मिठाचे प्रमाण मर्यादित ठेवा, सुकामेवा खा
 
मानवी शरीरात मेंदूचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. सर्वांत ट्रेडमिल, योगासने, चालणे आणि ध्यानधारणेमुळे मेंदू राहतो तरतरीत गुंतागुंतीची रचना असलेल्या मेंदूमुळेच आपले व्यवहार चालतात. स्मरणशक्ती ही त्याचीच कमाल आणि मानवी प्रगतीमागे आहे तो मेंदूच. अशा या अमूल्य मेंदूला काङ्र्मक्षम ठेवले तर तो विकासाच्या मार्गावर नेतो. त्याचे आरोग्य राखणे फार महत्त्वाचे आहे. त्यासाठी जीवनशैली आणि आहारात बदल करावे लागतील.
 
मानवी प्रगतीमागे मेंदूचे सर्वांत मोठे योगदान आहे. शिकारयुगात वावरणाऱ्या माणसाला आजच्या यंत्रयुगात आणले ते मेंदूने आणि भविष्यातील प्रगती घडवेल तो मेंदूच. असा हा अमूल्य मेंदू कार्यक्षम  ठेवणे अत्यावश्यक आहे. कारण त्याच्याशिवाय आपला एक क्षणही चालू शकणार नाही. मात्र, मेंदू कार्यक्षम ठेवणे सोपे नाही. मेंदूला उपयुक्त असा आहार घेणे, शारीरिक व्यायामाबरोबर मानसिक व्यायाम करणे आणि जीवनशैलीत सुधारणा करून आपण मेंदूची कार्यक्षमता कायम राखू शकतो आणि वाढवूसुद्धा शकतो, असे इंद्रप्रस्थ अपोलो हॉस्पिटलमधील न्यूरोसर्जन डॉ. अनुप कोहली यांनी सांगितले. या मार्गाने गेल्यामुळे आपला मेंदू निरोगी राहून आपल्याला दीर्घकाळापर्यंत  साथ देतो, असे ते म्हणाले. सक्षम, कार्यक्षम मेंदूसाठी आहार हा फार महत्त्वाचा घटक आहे. ममॅग्नेशियम, सेलेनियम, ट्रायटोफान (एक प्रकारचे अमिनो आम्ल) या घटकांचे प्रमाण भरपूर असलेल्या पदार्थांचा समावेश आहारात करावा. त्यामुळे उत्साहसुद्धा वाढतो. आहारात वयानुरूप बदल केल्याने कार्यक्षमता  वाढते आणि मेंदूही ताजातवाना राहतो,फ असा सल्ला आहारतज्ज्ञ डॉ. नीलांजना सिंह यांनी दिला आहे.
 
मेंदूची कार्यक्षमता वाढविण्यासाठी विविध संशोधने झाली आहेत. त्यातून आहार कसा असावा याचे काही निकष निश्चित करण्यात आले आहेत. ते असे :
  • स्मृतिभ्रंश टाळण्यासाठी आहारात ई जीवनसत्त्वाचा समावेश करावा. बदाम आणि अक्रोडासारख्या सु्नयामेव्यातून ते मिळत असल्याने रोजच्या आहारात थोडा तरी सुकामेवा असावा.
 
  • सी जीवनसत्त्वही आवश्यक असल्याने आवळा, संत्री, पपई, लिंबू, टोमॅटो, फुलकोबी, हिरवी मिरची यांचा समावेश आहारात करावा.
 
  • आहारात द्रवपदार्थांचा समावेश जास्त असावा. त्यासाठी सूप, डाळीचे कढण, दलिया आदी पदार्थ घ्यावेत.
 
  • ग्रीन टीमध्ये असलेल्या काही घटकांमुळे तणाव कमी होण्यास मदत होते. हा चहा गरम किंवा एकदम थंड घ्यावा.
 
  • रात्री झोपताना गरम दूध पिणे ही आरोग्याला फायद्याची ठरणारी सवय आहे. त्यामुळे मन शांत होऊन झोप व्यवस्थित होते.
 
  • स्मरणशक्ती वाढविण्यास उपयुक्त ठरणाऱ्या मॅग्नेशियम, फोलेट आणि पोटॅशियमचे प्रमाण पालकामध्ये भरपूर असते. फोलेटच्या कमतरतेमुळे स्मृतिभ्रंश तसेच अल्झायमरचा त्रास होऊ शकतो. त्यामुळे आहारात पालक असावा.
 
  • आठवड्यातून एकदा मासे खाणे चांगले. त्यातील ओमेगा-३ फॅटी अ‍ॅसिड मेंदू आणि डोळ्यांच्या आरोग्यासाठी उपयुक्त असते.
 
  • सफरचंद, कांदा, चहा, बीअर आणि वाइनमध्ये मफ्लेवोनॉइडफचे प्रमाण चांगले असते. त्यांचा आरोग्याला फायदा होतो.
 
  • हिरव्या पानांच्या भाज्यांमध्ये सी जीवनसत्त्वासारखी अँटीऑ्क्सिडेंतट भरपूर असतात. त्यातील 'कॅरेटोनॉइड्स'मुळे मेंदू अधिक कार्यक्षमहोतो.
 
  • पानकोबी, ब्रोकोली आणि मोड आलेली धान्येही फायद्याची असतात.
 
  • स्मरणशक्ती वाढविण्यासाठी ब्लॅकबेरी फार चांगल्या असल्याचे संशोधनात दिसले आहे. एखाद्या घटनेचे लगेच विस्मरण होत असेल, तर ब्लॅकबेरीचा समावेश आहारात करावा. व्यायामाचे महत्त्व किती हे सांगायला नको.
 
सध्याच्या जगात वाहनांच्या उपलब्धतेमुळे आपण चालणे विसरायला लागलो आहोत. लिफ्टच्या सोईमुळे जिने चढायचाही कंटाळा केला जातो. पण शरीरासाठी आहाराएवढाच व्यायामही महत्त्वाचा असतो हे लक्षात ठेवा. व्यायामामुळे स्नायू बळकट आणि लवचिक होतात. त्याशिवाय मेंदूही दीर्घकाळ कार्यक्षम राहतो. ट्रेडमिलवर धावण्याच्या व्यायामामुळे हृदय आणि फुफ्फुसांची कार्यक्षमता वाढते. चालणे हा बिनखर्चाचा सुंदर व्यायाम असून, रोज ४० मिनिटे चालण्याने खूप फायदे होतात. ४० मिनिटे चालण्याबरोबरच १५ मिनिटे योगासने आणि ध्यानधारणा केलीत, तर त्याचा फायदा शरीरासह मेंदूला होतो. दिवसभरात १५-२० मिनिटे सूङ्र्मप्रकाशात फिरा. त्यातून डी जीवनसत्त्व मिळते. एरोब्निसमुळे शरीर लवचिक- सडपातळ होऊन मेंदूतील न्यूरॉन्स पेशींची संख्या वाढते. मेंदूच्या आरोग्यासाठी हा व्यायाम फायद्याचा आहे. स्मरणशक्ती वाढवायची असेल, तर ध्यान करा. सावकाश प्रारंभ करून नंतर वेळ वाढवत न्या. योगासनेही आरोग्याला उत्तम असतात. सुर्यानमास्कारात  काही योगासने होतात. त्याशिवाय पर्वतासन, उत्तानासन आणि भुजंगासनासह काही योगासने मेंदूची कार्यक्षमता वाढविण्यासाठी उपयुक्त ठरतात, असा सल्ला योगाचार्य दीपककुमार झा यांनी दिला आहे. मेंदूच्या कार्यक्षमतेसाठी केवळ शारीरिक व्यायाम पुरेसा नसतो, तर थोडी चालनाही त्याला द्यावयास हवी, असे मानसशास्त्रज्ञ डॉ. समीर पारिख यांनी सांगितले. तर्कशक्ती वाढविणारे प्रश्न सोडविणे, कोडी सोडविणे किंवा सुडोकू कोड्यांची उत्तरे शोधण्यातून मेंदूला चालना मिळते. क्रॉसवड सोडविणे मेंदूसाठी फायद्याचअसते. कारण हे कोडे सोडविताना मेंदूच्या डाव्या बाजूचा उपयोग केला जातो.
 
तर्कबुद्धीशी या भागाचा संबंध असतो. आंघोळ करताना किंवा जेवताना डोळे बंद करून पाहा. त्यातून मेंदूला चालना मिळते. पत्त्यांमधील काही डाव किंवा बुद्धिबळासारखे खेळ मेंदूची कार्यक्षमता वाढवितात, असे ते म्हणतात. रोजच्या जीवनातील ताणतणाव पूर्णपणे चुकणे श्नय नसले, तरी त्यापासून दूर राहण्याचा प्रयत्न करा. अतिताणामुळे माणसाला लवकर वृद्धत्व येते हे लक्षात घ्या आणि तणाव दूर करण्यासाठी योगासने किंवा ध्यानधारणा करून मेंदूला काङ्र्मक्षम ठेवा. परिस्थिती कितीही विपरीत असली, तरी काही तरी चांगले नक्की घडेल अशी सकारात्मक मानसिकता जपा. नकारात्मक विचारांमुळे नैराश्य येते आणि मेंदूची काङ्र्मक्षमताही घटते. पण आशादायी विचार तुम्हाला समाधानी ठेवतात. रोजच्या नेहमीच्या आयुष्याला छंदांमुळे वेगळा रंग येतो. त्यामुळे तुमचा मेंदूही ताजातवाना होतो. त्यामुळे नीरसपणे जगण्याऐवजी एखादा छंद जोपासा आणि कितीही व्यस्त असलात, तरी दिवसभरातील थोडा वेळ छंद जोपासायला द्या. त्यातून तुमचे तणाव कमी होऊन तुम्ही फ्रेश व्हाल. बहुतेकांना संगीत ऐकण्याचा छंद असतो आणि तणाव दूर करण्यासाठी संगीत ऐकणे हा सर्वांत चांगला उपाय मानला जातो. घरी संगीत ऐकायला वेळ मिळत नसेल, तर कामाला जाताना आणि घरी येताना तुम्ही हा छंद पूर्ण करू शकता. हल्नयाफुल्नया संगीतामुळे तणाव निर्माण करणारी संप्रेरके निष्क्रिय होतात. त्यामुळे मनपसंत संगीत ऐका आणि ताणही घालवा. नृत्य ही केवळ कला नसून, तणावमुक्तीचे एक साधनसुद्धा आहे.
 
नृत्यामुळे मन शांत होऊन सकारात्मक विचारांना चालना मिळत असल्याचे दिसले आहे. तुमच्याकडे वेळ असेल, तर नृत्य शिका. त्यामुळे व्यायामाबरोबरच ताणही दूर होईल. फोटोग्राफी हा सर्जनशील छंद असून, त्यामुळे तुमचा वेळ छान जातो. आजूबाजूला अनेक घटना घडत असतात आणि त्या कॅमेऱ्यात टिपायला मजा येते. केवळ बागेत येणाऱ्या पक्ष्यांचे फोटो काढावयाचे ठरवलेत, तर तुम्हाला एक दिवससुद्धा पुरणार नाही. शिवाय अन्य घटना असतातच. निसर्गात वावरणे हा सुंदर छंद आहे. तुम्हाला बागकामाची आवड असेल, तर तुमचा वेळ चांगला जाईल आणि ताण दूर होतील. हिरवा रंग मनाला शांतता देतो. त्यामुळे बागकाम करा आणि आनंदी राहा. स्वयंपाकाची आवडसुद्धा जोपासता येते. तुमच्या कुटुंबीयांसाठी एखाद्या दिवशी तुम्हीच बल्लवाचार्य  व्हा आणि त्यांना एखादा खास पदार्थ खाऊ घाला. कुटुंबीयांचे आनंदी चेहरे तुम्हालासुद्धा सुखावतील
 
.काही घरगुती उपाय
ब्राह्मी वनस्पतीला मेंदूचे टॉनिक म्हणतात. त्यामुळे मेंदू शांत राहतो आणि स्मरणशक्तीही वाढते.
 
मेंदूच्या कार्यक्षमतेसाठी शंख पुष्पीही उपयोगी पडते.
 
स्मरणशक्ती वाढविण्यासाठी अक्रोड उपयुक्त असतात. त्यांच्यासोबत किसमीस घेतल्यास फायदा होतो.
 
खाद्यपदार्थांचा स्वाद वाढविण्यासाठी वापरले जाणारे केशर मेंदूच्या आरोग्यासाठीही उपयुक्त ठरते. त्याच्यामुळे निद्रानाश तसेच औदासीन्य दूर होते. त्याचप्रमाणे केशराच्या सेवनाने मेंदू कार्यक्षम होतात. 
 
यापासून दूर राहा
  • सॉफ्ट ड्रिंक्स  सेवन मेंदूसाठी चांगले नाही. या पेयांतील 'फ्रु्नटोज'मुळे मेंदूची कार्यक्षमता घटते. या पेयांच्या अतिसेवनामुळे स्मृतिभ्रंश होण्याचीसुद्धा शक्यता असते. 
  • साखर आणि साखरयुक्त पदार्थही मेंदूला चांगले नाहीत. कँडी, केक आणि मिठायांमध्ये 'फ्रु्नटोज' असते. त्यांच्या सेवनामुळे मेंदू कमजोर होतो. 
  • मिठातील सोडियममुळे बौद्धिक क्षमतेवर परिणाम होतो. 
  • फास्टफूड आणि जंकफूडमुळे मेंदूतील रसायनांची रचना बदलते.