चार पायांचा रोबोट 'स्वॉट मिनी'

Sandyanand    16-Jul-2020
Total Views |
 
ASAD_1  H x W:
 
 
तो इतर साथीदारांची गरज समजून मदत करतो 
 
येथील डायनाम्निस कंपनीने चार पायांचे रोबोट तयार केले आहेत. हा रोबोट त्याच्या इतर रोबोट साथीदारांची गरज समजून घेऊन मदत करतो. या स्वॉट मिनी रोबोटचे वजन ३० किलो असून, रुंदी ०.८४ मीटर आहे. हा रोबोट ९० मिनिटांत चार्ज होतो. हा रोबोट ऑफिसमधील वस्तू जागच्या जागी व्यवस्थित ठेवतो. इमारतीच्या पायऱ्या चढतो व माणसासारखा पाय उचलून चालतो. ऑफिसात, घरी किंवा बाहेर शेतातही काम करतो. त्याच्या सहकारी रोबोटला खोलीबाहेर जायचे असेल तर दरवाजा उघडतो व दुसरा रोबोट पूर्णपणे दरवाजाबाहेर जात नाही तोपर्यंत  दरवाजा धरून उभा राहतो. यापूर्वी डायनाम्निस इंजिनिअरिंग व रोबोटिक डिझाय कंपनीने अमेरिकन मिलिटरीसाठी बिग डॉग नावाचा हेर रोबोट तयार केला होता.त्याला मिलिटरीकडून चांगली मागणी होती. स्वाट मिनी रोबोटच्या व्यापारी उत्पादनास लवकरच सुरुवात करण्यात येणार आहे.