तुमच्या नाका-कानावर नीट बसणारा मास्क हवा

Sandyanand    15-Jul-2020
Total Views |
 
aSDAF _1  H x W
 
 
कोरोना साथरोगाचा फैलाव इतक्यात कमी होणारा नाही. उलट आता आपल्याला कोरोनाबरोबर जगायला शिकावे लागणार आहे. त्यामुळे काही गोष्टींची सवय लावून घ्यावी लागेल.
 
वारंवार हात धुणे, सुरक्षित अंतर राखणे आणि मास्क वापरणे. अर्थात या गोष्टींची आता आपल्याला सवय झाली आहेच. मास्क आता अविभाज्य घटक बनला आहे. त्यामुळे मास्क घालताना विशेष काळजी घेणे आवश्यक आहे.
 
चष्म्यावर वाफ येणे
१ .ज्यांना चष्मा आहे, त्यांना मास्क वापरणे जिकिरीचे असते. कारण श्वास घेताना चष्म्याच्या काचेवर वाफ जमा होते. मास्क          नाकावर नीट बसत नसेल, तरीही काचांवर वाफ जमा होते. त्यासाठी काही उपाय आहेत.
२.चष्मा नाकावर थोडा खाली घाला.
३.मास्क फिट बसतो आहे ना, याची खात्री करा. म्हणजे वरच्या बाजूने हवा सुटून ती काचेवर जमा होणार नाही.
श्वासोच्छ्वास धीम्या गतीने करा. श्वास नाकाने घ्या आणि तोंडाने सोडा.
 
ताजेतवाने राहा या काळात शुगर-फ्री पुदिन्याच्या गोळ्या चघळणे चांगले. त्यामुळे श्वासाला दुर्गंधी येत असेल, तर ती मास्कमध्ये राहणार नाही. मेंथॉलच्या चवीमुळे मास्क घातल्यावर श्वास घेणेही सोपे होते.
 
अस्वच्छता टाळा
लांब केस चांगले दिसत असले, तरी सांभाळायला अवघड असतात. त्यातून असे केस विषाणूला लवकर जागा करून देतात. ते टाळण्यासाठी तुमच्या केसांचे पोनीटेल बांधा. शक्यतो केस चेहऱ्यापासून लांब राहतील, असे पाहा.
 
त्वचेचे रक्षण करा
मास्कमुळे त्वचेला इजा होऊ शकते. त्यामुळे फोडही येऊ शकतात. मास्कमुळे नाक, गाल किंवा ओठांना त्रास होत असेल, तर मास्क चेहऱ्यावर जिथे घासला जातो, तेथे एक टिश्यू पेपरचा तुकडा ठेवून द्या.
 
एक मास्क जास्त हवा
घरातून बाहेर पडताना बरोबर मास्क असेलच याची खात्री करून घ्या. आणखी एक मास्कही तुमच्याबरोबर ठेवत जा. मास्क नेहमी स्वच्छच असेल, याची खात्री करून घ्या.