पावसाच्या थेंबापासून वीज बनविणारा जनरेटर

Sandyanand    15-Jul-2020
Total Views |
 
ASAD_1  H x W:
 
 
एका थेंबापासून शंभर एलईडी बल्ब पेटणे शक्य 
 
हाँगकाँग युनिव्हर्सिटी ऑफ हाँगकाँग (सीटीयू)च्या वैज्ञानिकांनी एक असा जनरेटर तयार केला आहे, जो पावसाच्या एका थेंबापासून शंभर लहान एलईडी बल्ब प्रकाशमान करू शकतो. उच्च क्षमतेचा हा जनरेटर विद्युत ऊर्जा उत्पादन क्षेत्रात जगासाठी एक प्रभावी पाऊल सिद्ध होऊ शकते. जर्नल नेचरच्या नवीन अंकात प्रकाशित झालेल्या या शोधाचे नेतृत्व सीटीयूच्या मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभागाने केले होते. हाँगकाँग युनिव्हर्सिटीचे इंजिनियर आणि प्रोफेसर जुआनकाय वांग यांनी सांगितले की, ऐकण्यात हे आश्चर्यकारक  वाटत असेल पण हे सत्य आहे. या संयंत्राद्वारे १५ सेंटिमीटरच्या उंचीवरून पाण्याची शंभर मायक्रोलिटरचा एक थेंब १४० व्होल्ट ऊर्जेचे उत्पादन करणे श्नय होईल. हा जनरेटर एका वेळी अनेक पट ऊर्जा निर्माण करू शकतो. हाँगकाँगचे वैज्ञानिक दीर्घ काळापासून या प्रोजे्नटवर काम करीत होते. त्यांना आता यश मिळाले आहे. या संयंत्रामध्ये दोन इले्नट्रोड असतील. त्यापैकी एक अ‍ॅल्युमिनियम आणि दुसरा पॉलीटेट्राफ्लूरोएथिलीन (पीटीएफई) कोटेड इंडियम टिन ऑ्नसाइडपासून तयार झालेला असतो. पॉलिटेट्राफ्लूरोएथिलीन इले्नट्रोडचा उपयोग कायमस्वरूपी असतो.
 
जेव्हा पाण्याचा थेंब त्यावर पडेल तेव्हा पुरेशी वीज उत्पन्न होईल, जेव्हा की सर्वसामान्य संयंत्रांमध्ये याची क्षमता कमी असते. थेंब कमी वारंवारितेच्या गतीज ऊर्जेने येतात. ज्यांचा परिवर्तनशील ऊर्जेच्या रूपाने चांगला वापर केला जाऊ शकतो. परंपरागत संयंत्रात ट्राइबोइले्िनट्रक प्रभावाच्याद्वारे (जेव्हा कोणतेही दोन पदार्थ एक दुसऱ्याच्या संपर्कात येतात तेव्हा, घर्षणाने इले्नट्रॉनचे देवाणघेवाण होते.) ऊर्जा उत्पन्न केली जाते. सर्वसाधारणपणे इंधनाच्या द्वारे इले्नट्रोड कमी ऊर्जा उत्पन्न करू शकतो. पण या तंत्रज्ञानाने ऊर्जेचे अधिक उत्पादन श्नय आहे. उच्च क्षमता असलेला हा जनरेटर एकावेळी आपल्या क्षमतेपेक्षा अनेक पटीने अधिक ऊर्जेचे उत्पादन करू शकतो. या जनरेटरमुळे पावसाच्या पाण्याचा पूर्ण वापर होऊ शकेल.