कुंड्यां मध्ये लावू शकता तुम्ही काकडीच्या वेली

15 Jul 2020 11:53:46
 
 
घराच्या आतमध्ये काकडीचे वेल लावायचे असल्यास त्या दृष्टीने खास तयार केल्या गेलेल्या काकडीच्या जाती विचारात घ्याव्यात. काकड्यांच्या वेलींना पाणी भरपूर लागते.
 
काकड्याच्या वेली घराबाहेर अंगणात चांगल्या येत असल्या तरी या वेली घराच्या आतमध्ये लावल्याने काकड्यांचे मुबलक उत्पन्न संपूर्ण वर्षभर मिळू शकते. घराच्या आतमध्ये काकडीचे वेल लावायचे असल्यास त्या दृष्टीने खास तयार केल्या गेलेल्या काकडीच्या जाती विचारात घ्याव्यात. बुश या प्रकारात मोडणारी काकडीची वेल घरामध्ये मोठ्या कुंड्यांमध्ये लावता येते किंवा बाहेरही लावता येते. कारण इतर काकड्यांच्या वेली जितक्या पसरतात तितक्या बुश काकड्यांच्या वेली पसरत नाहीत. त्यामुळे त्यांना वाढण्यासाठी माफक जागाही पुरेशी असते. एकदा या वेलीवर काकड्या यायला सुरुवात झाली की, या वेली पुष्कळ वजनदार होतात. त्यामुळे या वेली वर चढवण्यासाठी भक्कम आधार असावा. काकडीची वेल फार वेगाने वाढते. घरात काकडीची वेल लावत असाल तर सूर्यप्रकाश मिळण्यासाठी खोलीला एखादी मोठी खिडकी असावी. वेलीच्या व्यवस्थित वाढीकरिता त्यांना दिवसातून सहा ते सातवेळा सूर्यप्रकाश मिळावा याची काळजी घ्यावी. काकड्यांच्या वेलींना पाणी भरपूर लागते. काकडीच्या वेलीला काकड्या येण्याच्या वेळी सतत पाणी द्यायला हवे. योग्य जागा निवडून, भरपूर सूर्यप्रकाश मि ळेल याची खबरदारी घेऊन तसेच योग्यवेळी पाणी आणि योग्य हवामान ही सर्व काळजी घेतल्यास काकड्यांचे उत्पन्न घरामध्ये लावलेल्या वेलींपासून मिळवता येऊ शकते.
 
Powered By Sangraha 9.0