निसर्गातील काही चमत्कारिक फुल

Sandyanand    14-Jul-2020
Total Views |
 
abc_1  H x W: 0
 
 
निळा गुलाब : दक्षिण आफ्रिकेच्या जंगलात निळा गुलाब पहायला मिळतो विशेष म्हणजे रात्रीच्या वेळी ह्या फुलातून ठिणग्या बाहेर पडतात. पाकोळी किंवा कीटक त्याच्या जवळ गेले असता ते ह्या ठिणग्यामुळे भस्मसात होऊन जातात.
 
वजनदार फुल : केनियातमलूवरफ नावाचे एक फुल आहे. त्याचे वजन ३०० ग्रॅम असते. हे फुल खाल्ले असता डोक्यावर केस उगवतात अशी तेथील लोकांची समजूत आहे.
 
चवीला गोड असणारे फुल : सायबेरियात बर्फाळ पर्वतरांगात आढळणारे मुल्का नावाचे नारंगी फुल आपल्याकडील कमळा सारखेच असते. ह्या फुलाची चव साखरेहून देखील गोड असते. तेथील लोक ह्या फुलाचा रस गोड पदार्थ करण्यासाठी वापरतात.
 
गुंगी आणणारे फुल : ऑस्ट्रेलियाच्या उत्तर पठारावर काही विषारी फुले फुलतात ज्यांच्या गंधाने कीटक हे बेशुद्ध पडतात केवळ इतकच नाही तर या फुलाचा गंध इतका तीव्र असतो की हत्ती सारखा प्राणी देखील बेशुद्ध पडू शकतो.
 
चुंबकीय फुल : उत्तर अमेरिकेच्या समुद्रात नोस्ल नावाचे एक निळे फुल उमलते. त्याला पाच पाकळ्या असतात. सोने आणि चांदी या धातुंना चुंबका प्रमाणे आकर्षित करून घेण्याची क्षमता या फुलात असते.
 
काळे फुल : ब्राझील मध्ये एक काळे रंगाचे फुल आहे ज्याच्या वासाने सर्दी पडसे बर होते. अनेक लोक ह्या फुलाचा वास घेण्यासाठी, आपले दुखणे बर करण्यासाठी येतात.
 
रेफलशिया : जावा देशाच्या उत्तरेकडील जंगलात रेफलशिया नावाचे फुल उमलते. हे जगातील सर्वाधिक वजनाचे फुल आहे. त्याचे वजन १२ किलो असते. हे फुल परजीवी आहे. हे केवळ जावाफ त पहायला मिळते बाकी कोठेही नाही.