भारतीय सैनिकांच्या आस्थेचे प्रतीक : तनोट माता मंदिर

14 Jul 2020 14:36:41
 
 
१९६५च्या भारत-पाकिस्तान युद्धात तनोटवर आक्रमण करण्यापूर्वी पाकिस्तानने पूर्वेकडील किशनगढ पासून ७४ किमी दूरवर असणाऱ्या बुईली पर्यंत तर पश्चिमेला शाहगढ आणि उत्तरेला ६ किमी पर्यंत कब्जा केला होता.
 
जैसलमेर पासून १३० किमी अंतरावर तनोट माता मंदिर आहे. स्थानिक लोकांचे ते श्रद्धास्थान आहेच पण विशेष म्हणजे ते भारतीय सैनिकांच्या आस्थेचे प्रतिक बनले आहे. १९६५च्या भारत-पाकिस्तान युद्धात तनोटवर आक्रमण करण्यापूर्वी पाकिस्तानने पूर्वेकडील किशनगढ पासून ७४ किमी दूरवर असणाऱ्या बुईली पर्यंत तर पश्चिमेला शाहगढ आणि उत्तरेला ६ किमी पर्यंत कब्जा केला होता. तनोटला तीनही बाजुंनी पाकिस्तानने घेरले होते. जर तनोट वर पाकिस्तानने विजय मिळवला असता तर रामगढ ते शाहगढ असे त्यांनी वर्चस्व मिळवले असते. सलग तीन दिवस तनोटवर आक्रमण केले गेले. पाकिस्तानचा तोफखाना तनोटवर बरसत होता. जवळजवळ ३००० तोफगोळे तनोटवर टाकले गेले, त्यापैकी बरेच गोळे चुकले तर बाकीचे फुटलेच नाहीत. मंदिरावर एक ओरखडा देखील उमटला नाही आणि पाकिस्तानला विजय मिळवता आला नाही. देवी आपल्या सोबत आहे या श्रद्धेने भारतीय सैनिकांना बळ मिळले पुढे हे युद्ध आपण qजकले देखील. तनोट देवीला qहगलाज माता देखील म्हंटले जाते. qहगलाज मातेचे शक्तीपीठ सध्या पाकिस्तानातील बलुचिस्तान प्रांतातील लासवेला येथे आहे. राजपूत नरेश तणूराव ह्यांनी तनोटला राजधानी बनवली होती. त्यांनी इसवी सण ८२८ मध्ये मंदिराची स्थापना केली. भाटी राजवंशातील लोक आणि जैसलमेर येथील लोक पिढ्यानपिढ्या या देवीची उपासना करतात. कालांतराने भाटी राजवटीने आपली राजधानी जैसलमेरला हलवली परंतु देवीचे तनोटलाच राहिले.
Powered By Sangraha 9.0