कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी पॉलिमर नोटा जारी करा : कॅट

14 Jul 2020 14:36:24
 
 
कोरोना व्हायरसचा संसर्ग रोखण्यासाठी जगभर त्वरित पॉलिमर नोटा चलनात आणाव्यात, अशी मागणी कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स (कॅट) या संघटनेने केली आहे. या संदर्भात कॅटने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रिझव्र्ह बँकेच्या गव्हर्नरांना पत्र पाठवून ही मागणी केली आहे. अनेक वस्तुंच्या संपर्कात आल्याने स्पर्शाने, शिंक किंवा खोकल्यामुळे बाहेर पडणाऱ्या qशतोड्यातून कोरोनाची लागण होण्याची श्नयता असते. अशा वस्तुंमध्ये चलनी नोटांचाही समावेश आहे. त्यामुळे कागदी नोटांच्या जागी पॉलिमरच्या नोटा चलनात आणाव्या तसेच देशभर डिजिटल पेमेंटला प्रोत्साहन द्यावे. कागदी नोटा अनेकांच्या हातातून जातात त्यात, कोरोनाबाधितांचाही समावेश आहे. त्यामुळे कागदी नोटांमुळे कोरोनाच नव्हे, तर इतर व्हायरसचाही संसर्ग होण्याची श्नयता असते. त्यामुळे शक्य  तित्नया लवकर जगभर पॉलिमर नोटा चलनात आणाव्यात कारण अनेक देशांनी पॉलिमर चलन स्वीकारले आहे. अशी या पत्रात सूचना करण्यात आली आहे.
Powered By Sangraha 9.0