गुजरातमध्ये आहे मंगळाच्या पृष्ठभागासारखी अनोखी जागा

14 Jul 2020 14:36:40
 
 
 
गुजरातमध्ये कच्छचे धार्मिक स्थळ माता ना मढ बाबत एक नवी गोष्ट समोर आली आहे. असे समजले आहे की, हे स्थळ जगातील एकुलती एक अशी जागा आहे की जिचा पृष्ठभाग मंगळासारखा आहे.
 
ही माहिती समजल्यानंतर देशोदेशीचे अंतराळसंशोधक संस्था अभ्यासासाठी येथे पोहोचू लागल्या आहेत. या पृष्ठभागाचे इस्रो, आयआयटी खरगपूर आणि जियोफिजिकल रिसर्च हैद्राबाद संयुक्त संशोधन करतील. आयआयटी खडगपूर भूशास्त्र विभागाचे अध्यक्ष प्रो. साईबल गुप्ता म्हणाले, मभविष्यात या अध्ययनातून नासा व इस्रोच्या मिशन दरम्यान लँडिंग साइट ठरवण्यास मदत मिळेल. माता ना मढचा अभ्यास महत्त्वाचा ठरेल.फ त्यांनी सांगितले की, म हायड्रो सल्फेट ऑफ पोटॅशियम आणि लोखंड तत्वाच्या घटकांपासून जॅरोसाइट तयार होते. हे माता ना मढच्या जमिनीत आढळले आहे.फ तिकडे अमेरिकेच्या वॉशिंग्टन विद्यापीठाच्या वैज्ञानिकांनी या स्थळाची पाहणी केली. ते म्हणाले, मखनिज शास्त्रावर संशोधन करण्यासाठी ही उतम जागा आहे. येथे दुर्मीळ खनिज जॅसोराइस स्पॉट शोधायला सुमारे साडेतीन वर्षे लागली. याच्या शोधात सुमारे १० लाख रुपये खर्च झाले आहेत. स्पॅ्नट्रोस्कोपिक आणि ए्नस रे डिफ्रॅ्नशन पॅटर्न पद्धतीने हा स्पॉट शोधता येऊ शकतो.
 
मंगळावर होणाऱ्या बदलाचा पत्ता लावणे हा हेतू : भूशास्त्र विशेषज्ञ डॉ. महेश ठक्कर यांनी सांगितल की, ममाता ना मढफ जगातील एकमेव असे स्थान आहे जिथे बेसाल्ट टॅरेइन(काळा दगड) मध्ये जॅरोसाइट आढळले आहे. याद्वारे केल्या जाणाऱ्या संशोधनाचा विषय आहे. मंगळावर पाण्याचे अस्तित्व आणि प्राचीन काळापूर्वीच्या वातरवरणात झालेल्या बदलामुळे कोणते बदल झाले आहेत.
Powered By Sangraha 9.0