सेलिब्रिटी टॉक्स :जॉन अब्राहम

Sandyanand    14-Jul-2020
Total Views |
 
abc_1  H x W: 0
 
मी जेव्हा मॉडेलिंग  करीत होतो, तेव्हा मला फ्नत एक सुपर मॉडेल व्हायचं होतं. चित्रपट अभिनेता वगैरे होण्याचं माझं स्वप्न मुळीच नव्हतं. हल्ली अनेक जण यासाठी मॉडेलिंग करतात कारण त्यांना पुढे जाऊन अभिनेता व्हायचं असतं. पण, माझ्या काळात मात्र मला फक्त  मॉडेलिंगच  करायचं होतं.
 
मी एमबीए केल्यानंतर एका जाहिरात एजन्सीत कामही करीत होतो आणि सोबतच मॉडेलिंग करीत होतो. मला अनेक जण अ‍ॅक्सिडेंटल अ‍ॅक्टर म्हणतात. अपघातानं मी या इंडस्ट्रीमध्ये आलो, असंही काही जण म्हणतात. महेश भट मला त्या काळी भेटले. मला म्हणाले, की मला असा एक अभिनेता हवा आहे, की जो संजय दत्तसारखा दिसेल. म्हणजे, संजय दत्तसारखी शरीरयष्टी हवी, पण चेहऱ्यावर मात्र निरागसपणा हवा आहे. तशी खुबी तुझ्यात आहे. तर तू प्रयत्न करून पाहशील का... मी होकार दिला. तो माझा पहिला चित्रपट होता फजिस्म..फ मी ज्या काळी सुरुवात केली तेव्हा तो पुरुष सुपर मॉडेल्सचा एक जमाना होता. म्हणजे दीपक मल्होत्रा, मिqलद सोमण, राहुल देव, अर्जुन रामपाल किंवा दिनो मोरिया असे मॉडेल्स होते. मी मॉडेलदेखील असं काही ठरवून झालो नाही. त्यावेळी मी जाहिरात एजन्सीमध्ये काम करीत होतो. मला १३,८०० रुपये पगार मिळत होता आणि टॅक्स वगैरे कट करून मला ११,५०० रुपये पगार मिळत होता. एके दिवशी कोणी मॉडेल आला नाही. तर आमचा मॅनेजर म्हणाला, तू आजच्या दिवशी त्याचं मॉडेqलग कर. मी माझं काम संपवून तिकडे गेलो. जीन्स पँट परिधान केली. चांगल्या प्रतिक्रिया मिळाल्या आणि पुढे ते जीन्स पँटचं कॅम्पेन मी केलं. त्यानंतर अनेक असाईनमेंट मला मिळाल्या