महिलांसाठी जेवणापेक्षा नाष्टा जास्त महत्त्वाचा...

Sandyanand    14-Jul-2020
Total Views |
 
lhjgl _1  H x W
 
 
आपल्या देशात अनेक भागांमध्ये पुरुष आणि मुलांच्या नाष्ट्याची योग्य व्यवस्था असते, पण महिलांच्या नाष्ट्याकडे पुरेसं लक्ष दिलं जात नाही.
 
अनेक महिला नाश्त्याशिवाय किंवा अपुऱ्या नाष्ट्याद्वारे आपलं काम भागवतात. परिणामी त्या लवकरच आजारांना बळी पडतात. याचा मुलं आणि कुटुंबीयांवर विपरीत परिणाम होतो. या सगळ्याला काही प्रमाणात महिलासुद्धा जबाबदार आहेत. त्या स्वतःच आपल्या नाष्ट्याविषयी उदासीन असतात. खरंतर त्यांनी स्वतःच आपल्या नाष्ट्याकडे लक्ष द्यायला हवं. तसंच घरातील व्यक्तींनीही घरातील महिलांनी नाष्टा केला का, याची विचारणा करायला हवी. जेवणाची तयारी, त्याची व्यवस्था हे करण्यात महिलांचा बराच वेळ जातो. अशावेळेस त्यांना नाष्ट्याचं महत्त्व समजणं, नाष्ट्यामध्ये कोणत्या पदार्थांचा समावेश असायला हवा आणि त्याचं कोणत्या क्रमाने सेवन करायला हवं, हेसुद्धा माहीत असायला हवं. हे सत्य स्वीकारा की, भोजनापेक्षा जास्त महत्त्वाचा नाष्टा आहे. आपलं आरोग्य आपल्या नाष्ट्याच्या निवडीवर बऱ्याच प्रमाणात अवलंबून आहे.
 
सकाळचा नाष्ट्या हा खूप कालावधीच्या उपवासानंतरचा ग्रहण करणारा पहिला खाद्यपदार्थ असतो, म्हणून तो शरीरासाठी खूप महत्त्वाचा असतो. म्हणून नाष्ट्यामध्ये पौष्टिकता खूप महत्त्वाची आहे. सकाळच्या नाष्ट्यामध्ये शक्यतो मोड आलेली कडधान्यं, ताजी फळं, दूध, दलिया यांचा समावेश करायला हवा. शारीरिक श्रम करणाऱ्या व्यक्तींसाठी ब्रेड बटर हा चांगला पर्याय आहे, पण यामुळे चरबी वाढत नाही ना, याकडे लक्ष द्या. ताज्या फळांचा रस शरीरासाठी फायदेशीर ठरतो. पण जर तुम्ही फळं चावून खाऊ शकत असाल तर रस न पिणं उत्तम. शक्य असल्यास ताजं ताक प्या. हेसुद्धा उत्तम पेय आहे. नाष्ट्या पौष्टिक असावा, नियमित करा, त्याचबरोबर हेसुद्धा आवश्यक आहे की, त्याची एक निश्चित वेळ असावी. स्वतःला आणि आपल्या कुटुबीयांना पौष्टिक नाष्टा देण्यासाठी आग्रही रहा. महागडे पदार्थच पौष्टिक असतात, असं मानू नका. हंगामी फळं, मोड आलेली कडधान्यं, दलिया हे सुद्धा पौष्टिक आहे. अनेक पदार्थ पौष्टिक नाष्ट्याच्या यादीत येतात. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, तुमच्या चांगल्या आरोग्यासाठी नाश्ता खूप महत्त्वाचा आहे. मुलांमध्येही आरोग्यदायी नाश्त्याची सवय विकसित करा. सतत बाजारातून विकत आणून पदार्थ खाऊ नका. यामुळे पैसे आणि आरोग्य दोन्ही नष्ट होईल. नाष्ट्याचा चांगला परिणाम तुमच्या आरोग्यावर झालेला नक्कीच दिसेल.