कोणत्या कपड्यांपासून काय करता येऊ शकतं?

Sandyanand    12-Jul-2020
Total Views |
 
ty _1  H x W: 0
 
कपाटातील बरेच कपडे खूपदा वापरल्यामुळे त्याचा कंटाळा येतो. पण तरीही ते टाकले जात नाहीत. ते गाठोड्यात पडून राहतात. मात्र थोडी कल्पकता दाखवून कलाकुसर करून अशा कपड्यांचा पुनर्वापर करता येतो.
 
उशीचे कव्हर : जे शट किंवा कुर्ते वापरले जात नाहीत, तसेच पडून आहेत, ते उशीच्या आकारात कापा, त्यापासून उशीसाठी खोळ बनवता येईल. लेस किंवा फ्रिल काढून ते टेबलच्या कव्हरला, पडद्यांना लावता येतात. मुलांच्या कपड्यांवर काहीवेळा काटून पॅच असतात तेही टेबल कव्हर किंवा बेडचे कव्हर यांना लावता येतात. काही कपड्यांवर छान कलाकुसर केलेली असते, काहींना लेस, फ्रिल्स लावलेले असतात. या सर्व गोष्टींचा छान उपयोग करता येतो.
 
बॅग : जुन्या जीन्स किंवा कार्गो पॅन्ट या काही दिवस वापरूनही फाटत नाहीत. काहीवेळा रंग उतरतो. त्याही तशाच कपाटात ठेवलेल्या असतात. या पँटचा खिशापर्यंतचा  भाग कापून वेगळा करा. वरच्या भागाच्या तळाशी व्यवस्थित टिप मारा. वरच्या भागाला चेन लावून घेतली तर त्याची चांगली बॅग होईल
 
जुन्या कपड्याचे आणखी काही उपयोग : जुन्या झालेल्या होजिअरी टीशटने स्वच्छता करता येते. काच स्वच्छ करताना मऊ झालेला टीशट वापरला तर काचेवर ओरखडे उठत नाहीत. कपड्यांवरील मोठ्या आरेखनापासून आपण फ्रेम बनवू शकतो. साडीपासून, पंजाबी ड्रेस, कुर्ता किंवा मॅ्नसी गाऊनही तयार करू शकतो. प्रिंटेड कपड्यांपासून लॅम्प शेड बनवू शकतो.