कोरोना रुग्णालयातील खाटांची माहिती आता ऑनलाइन

Sandyanand    12-Jul-2020
Total Views |

gh_1  H x W: 0  
 
ठाणे महापालिकेचा उपक्रम : 'ऑनलाइन बेड अलोकेशन सेवा' कार्यान्वित
 
शहरातील कोरोनाबाधितांना रुग्णालयात दाखल करण्याची प्रक्रिया अधिक सोयीस्कर व्हावी, या उद्देशाने ठाणे महापालिका प्रशासनाने मऑनलाइन बेड अलोकेशन सेवाफ सुरू केली आहे. या सेवेच्या माध्यमातून कोरोना रुग्णाच्या प्रकृतीप्रमाणे त्याला योग्य त्या रुग्णालयात दाखल करण्याची प्रक्रिया अधिक सुलभ झाली असून, या सेवेच्या माध्यमातून रुग्णवाहिका मिळवणेही शक्य होणार आहे. शासनाच्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांच्या प्रकृतीनुसार योग्य त्या रुग्णालयात दाखल करणे आवश्यक आहे. मात्र, ही प्रक्रिया अतिशय गुंतागुंतीची असून, त्यात सुलभता आणण्यासाठी महापालिका आयुक्त डॉ. बिपिन शर्मा यांनी मऑनलाइन बेड अलोकेशन सेवाफ सुरू करण्याचा निर्णय घेतला. या सेवेसाठी पालिका प्रशासनाने संकेतस्थळ तयार केले आहे.
 
या संकेतस्थळामुळे शहरातील रुग्णांना योग्य त्या ठिकाणी दाखल करण्याची प्रक्रिया सोपी झाली आहे. महापालिकेने बनविलेल्या www. covidbedthane.in या संकेतस्थळावरून वेबलिंक  उघडल्यानंतर रुग्णांना आवश्यक ती माहिती भरावी लागते. ही सर्व माहिती महापालिका मुख्यालयातील मध्यवर्ती बेड अलोकेशन पथकाला प्राप्त होते. या माहितीच्या आधारे रुग्णाच्या प्रकृतीनुसार त्याला कोव्हिड केअर सेंटर, डेडिकेटेड कोव्हिड हेल्थ सेंटर किंवा डेडिकेटेड कोव्हिड रुग्णालय यांपैकी कोठे दाखल करण्याची आवश्यकता आहे, त्याचा निर्णय घेतला जातो. रुग्णाने रुग्णवाहिकेची मागणी केल्यास त्याची माहिती रुग्णवाहिका पथकाकडे पाठविली जाते. त्यानंतर संबंधित रुग्णाला सेंट्रल बेड अलोकेशन टीम आणि रुग्णवाहिकेची माहिती असणारा संदेश पाठवण्यात येतो. रुग्णांच्या मागणीनुसार त्याला कोव्हिड केअर सेंटर, डेडिकेटेड कोव्हिड हेल्थ सेंटर किंवा डेडिकेटेड कोव्हिड रुग्णालय यांपैकी कोठे दाखल व्हायचे आहे, त्यानुसार रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्यात येत