फेंगशुईनुसार बेड योग्य जागी असेल, तर पती-पत्नीमधील प्रेम वाढेल

Sandyanand    12-Jul-2020
Total Views |
 
gh_1  H x W: 0
 
प्रेम हे जीवनाचे महत्त्वपूर्ण व अभिन्न अंग आहे. जीवनाची उत्पत्ती ही प्रेमभावनेतूनच होते. जर पतिपत्नी प्रेमाने नांदत असतील, तरच होणारी संततीही सरकारी निर्माण होऊ शकते. नात्यात जर प्रेमच नसेल, तर सर्व काही असूनही जीवनाला काहीच अर्थ उरत नाही.
 
नात्यांमध्ये माधुर्य असणे महत्त्वाचे ठरते; परंतु कधी कधी नात्यांमध्ये दुरावा निर्माण होतो. फेंगशुईतील काही टिप्सचा अवलंब करून तुम्ही हा दुरावा दूर करून प्रेमभावना वाढवू शकता. फेंगशुईनुसार तुमच्या घरातील बेडरूम, बाथरूम व किचन या तिन्ही स्थानी सकारात्मक ऊर्जेचे संतुलन राहणे आवश्यक आहे. प्रेम संबंधाच्या दृष्टीने या तिन्ही जागा महत्त्वाच्या ठरतात. जर या तिन्हीपैकी कोणत्याही स्थानी फेंगशुई सकारात्मक ऊर्जेचा स्तर कमी झाला, तर त्याचा थेट परिणाम तुमच्या प्रेमसंबंधावर पडणार हे नक्की. तुमचा बेड खोलीच्या एका कोपऱ्यात असेल, दरवाजामागे झाकला गेला असेल, तर त्यामुळे त्या खोलीत नकारात्मक ऊर्जेचा संचार होतो. बेड हा खोलीच्या मधोमध असावा.
 
बेडरूमला स्टोअररूम बनवू नका. बेडरूममध्ये नकारात्मक दुःखी चेहऱ्याची रोगशोक प्रदर्शित करणारी पेंटींग्ज  लावू नका. फेंगशुईनुसार पृथ्वीतत्त्व व अग्नितत्त्व ही दोन्ही तत्त्वे प्रेमसंबंधांचे प्रतिनिधित्व करणारी आहेत. म्हणूनच या दोन्ही तत्त्वांचा प्रभाव वाढवणाऱ्या फेंगशुई गॅजेट्सचा बेडरूममध्ये जास्त उपयोग करा, याउलट जलतत्त्व, काष्ठ तत्त्व (लाकूड) आणि धातुतत्त्वाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या फेंगशुई गॅजेट्सचा बेडरूममध्ये कमीत कमी वापर करा. बेडरूममध्ये प्रेमी कपल वा पक्षीयुगुल यांची प्रतिमा/पेंटिंग  स्थापन करा. विवाहयोग्य तरुण तरुणींनी मनपसंत जीवनसाथी लाभण्यासाठी आपल्या खोलीत चंद्रासंबंधित पेंटिंग  लावाव.,