मुलांची भावना काय आहे, हे समजून घ्या...

Sandyanand    12-Jul-2020
Total Views |
 
pu_1  H x W: 0
 
 
पालक आणि पाल्य या नात्यात सगळ्यात जास्त कशामुळे समस्या तयार होत असेल, तर ती म्हणजे नेमकेपणाने एकमेकांच्या भावना समजून न घेणे. अनेकदा मुलांची भावना काय आहे, हे समजून घेतलं जात नाही. राग, द्वेष, मत्सर, हेवा, दु:ख यांपैकी नेमकं त्यांना काय वाटतंय, तेच समजून घेतलं पाहिजे. हे लक्षात आलं तर ते शब्दात मांडता यायला हवं. याला म्हणतात भावनिक साक्षरता.
 
भावना इतरांपर्यंत पोहोचवता आल्या की मार्ग अपमान न करता, त्यात सुधारणा दाखवायला हवी. पालकांनी मुलांसोबत वेळ घालवायला हवा. तुमच्या मुलांनी तुमचा आदर करण्यापेक्षा तुमची आणि त्यांची मैत्री होणे सर्वात अधिक महत्त्वाचे असते, हे लक्षात घेतले पाहिजे आणि जिथे मैत्री तयार होते तिथे आपोआप जबाबदारीची जाणीव आणि आदरदेखील तयार होतोच. मेंदूच्या वाढीसाठी विविध अनुभवांची गरज असते आणि अन्नघटकांअभावी शरीराची वाढ खुंटते, तशी विविध ज्ञानेंद्रियांमार्फत, कर्मेंद्रियांमार्फत' जे अनुभव मिळतात, त्यांच्याअभावी मेंदूची वाढ खुंटू शकते. म्हणूनच मुलांना वेगवेगळे अनुभव घेऊ द्या. मुलांना पाण्यात खेळू द्या, रंगांत हात बुडवू द्या, चिकणमातीच्या वस्तू बनवू द्या. या कृतींमधून त्यांच्या क्षमतांचा विकास होईल, तो त्यांना फक्त औपचारिक शिक्षणापुरताच नाही तर, संपूर्ण जीवनात उपयोगी पडेल. त्यांना मोकळ्या हवेत खेळू द्या, झाडांवर चढू द्या, वाळूत खेळू द्या, झाडांना पाणी घालू द्या, आपण मुलांचे खेळगडी, सवंगडी होणे आवश्यक आहे.
 
मुलांना महागडी खेळणी आणण्यापेक्षा त्यांच्याशी थोडा वेळ गप्पा मारा. त्यांना घरातली भांडीकुंडी, इतर वस्तूंशी खेळू द्या. ती अशा अनुभवांमधूनही सतत शिकत असतात. खेळ, संगीत, चित्रकाम, कलाकाम, नृत्य, वादन, नाट्य, अभिनय, हे फक्त मनोरंजनाचे किंवा तासिका भरण्याचे विषय नव्हेत. या अशा कृती आहेत ज्यांनी विविध क्षमतांचा विकास होतो. त्यामुळे मुलांना ह्यात रमू द्या. रोजच्या जीवनातील छोट्या छोट्या स्वावलंबनाच्या कृती, जसं - स्वत:चे कपडे घडी करणं, स्वत:ची बॅग स्वत: भरणं, उचलणं, जेवणानंतर स्वत:चं ताट घासणं, सुकलेले कपडे घडी करून ठेवणं, जेवणाची तयारी करणं, वैयक्तिक स्वच्छतेच्या गोष्टी करणं, या फ्नत शिस्त लावण्यासाठी नव्हे, व्यक्तिगत  विकासासाठी आवश्यक आहेत. मात्र त्या करताना पालकांनी कुटुंबातील इतर व्य्नतींनी हे पथ्यं पाळायला हवं, की मुलांकडून अवास्तव अपेक्षा न करता, त्यांच्या प्रयत्नांचं कौतुक करायला हवं. मुलांच्या चुका समजून घेऊन, त्यांचा वैयक्तिक