पुण्यात दहा दिवसांचा लॉकडाऊन

Sandyanand    12-Jul-2020
Total Views |
 
rt_1  H x W: 0
 
शहरात तीन हजार खाटांची व्यवस्था करणार
 
पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील कोरोनाबाधितांची वाढती संख्या लक्षात घेता १३ जुलैच्या (सोमवार) मध्यरात्रीपासून ते २३ जुलैच्या मध्यरात्रीपर्यंत दहा दिवसांचा कडक लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. शहरातील वाढत्या रुग्णसंख्येच्या पाश्र्वभूमीवर वाघोली, बालेवाडी, सणस मैदान आणि हडपसर येथील ग्लायडिंग सेंटर या चार ठिकाणी मिळून तीन हजार खाटांची व्यवस्था करण्यात येणार असल्याची माहिती पुण्याचे महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांनी येथे दिली.
 
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत विधान भवनात कोरोना स्थितीबाबत आढावा बैठक घेण्यात आली. त्यातच पवार यांनी लॉकडाऊनचा इशारा दिला. त्यानंतर विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी लॉकडाऊनची घोषणा केली. दोन्ही शहरांतील अत्यावश्यक सेवाच या काळात सुरू राहतील, असे डॉ. म्हैसेकर यांनी सांगितले. लॉकडाऊनपूर्वी येत्या दोन दिवसांत नागरिकांनी जीवनावश्यक वस्तूंची खरेदी करून घेण्याचे आवाहन आयुक्त गायकवाड यांनी केले. या लॉकडाऊनच्या काळात बाधितांच्या संपर्कात येणार्यात व्य्नतींची तपासणी करून, २४ तासांत रिपोट देण्यावर आमचे लक्ष असणार आहे. त्यामुळे बाधितांची संख्या नियंत्रणात येण्यास मदत होणार आहे. शहरात अनेक रुग्णालयांत खाटा मिळत नसल्याच्या तक्रारी आल्या आहेत. त्या पाश्र्वभूमीवर महापालिका ऑक्सिजनची सुविधा असलेल्या ६०० खाटांची सुविधा येत्या आठ दिवसांत उपलब्ध करून देणार असल्याचे गायकवाड यांनी सांगितले.