मधमाश्यांसोबत महिलेचे प्रेग्नन्सी फोटोशूट

Sandyanand    11-Jul-2020
Total Views |
 
lhjgl _1  H x W
 
 
मॅटर्निटी किंवा प्रेग्नंसी फोटोशूटचा ट्रेण्ड गेल्या काही वर्षांपासून सुरू झाला. वेगवेगळे इफेक्ट्स, वेगवेगळी पोझ, हटके जागा शोधून हा फोटोशूट इतरांपेक्षा वेगळा कसा करता येईल, असा विचार अनेकजण करतात. सध्या सोशल मीडियावर असाच एक मॅटर्निटी फोटोशूट चर्चेचा विषय ठरतोय. टेक्सासमधल्या बोर्नी इथे राहणाऱ्या एका गर्भवती महिलेनं चक्क हजारो मधमाश्यांसोबत फोटोशूट केलं आहे. या फोटोतील तिच्या पोटावर असलेल्या मधमाश्या पाहून नेटकरी चक्रावले आहेत. पांढऱ्या रंगाच्या ब्रालेट आणि ट्राऊजरमध्ये या गरोदर महिलेनं पतीसोबत मिळून आऊटडोअर फोटोशूट केलं आहे. फोटोतील ही महिला मधमाश्यांचं पालन करणारी आहे. फोटोशूटसाठी मधमाशांचं पोळं असलेल्या बॉक्सजवळ ती उभी आहे. तर अनेक मधमाश्या तिच्या अवतीभवती फिरत आहेत.
 
हे माझ्या मॅटर्निटी फोटोशूटचे काही फोटो आहेत. माझ्या शरीरावर फक्त मधमाश्या सोडण्यात आल्या होत्या. एकाही मधमाशीने माझ्यावर हल्ला केला नाही. दहा हजारांच्या आसपास या मधमाश्या असतील, अशी तिची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्या महिलेने फेसबुकवर हे फोटो पोस्ट केले होते. त्यानंतर सोशल मीडियावर ते तुफान व्हायरल झाले. तिच्या या फोटोवर अनेकांनी आश्चर्य व्य्नत केले आहे. गर्भाशयातील बाळाचे प्राण धोक्यात घातल्याची टीकाही काहींनी केली. तर डॉक्टरांनी असे करण्यास परवानगी कशी दिली, असा प्रश्न काहींनी उपस्थित केला. नेटकऱ्यांच्या या प्रतिक्रियांनंतर महिलेनं फोटोशूटसोबतच एक सूचना पोस्ट केली. महे अत्यंत धोकादायक ठरू शकतं. कोणत्याही अनुभवाशिवाय किंवा माहितीशिवाय असे फोटोशूट करण्याचा प्रयत्न करू नकाफ, अशी सूचना तिने लिहिली. तरीसुद्धा महिलेला मधमाश्यांच्या थीमनुसार फोटोशूट करायचं सुचलंच कसं, असा प्रश्न नेटकऱ्यांना पडला आह