सेलिब्रिटी टॉक्स : गुलशन ग्रोवर

Sandyanand    11-Jul-2020
Total Views |
 
abc_1  H x W: 0
 
 
मी शाळेतल्याही नाटकांमध्ये काम केलं. पण, माझी अभिनयाची जी आवड होती तिला दिल्ली विद्यापीठात चांगली संधी मिळाली. त्यापूर्वी मी रामलीला करत होतो. दिल्लीमध्येच होणाऱ्या रामलीलेमध्ये वानरसेनेत मी असायचो. तीच आवड जोपासत राहिलो. कॉलेजमध्ये फाईन आटस् विभाग होता. मी आधी तिथे सचिव झालो, मग मी त्याचा अध्यक्षही होतो. कॉलेजमध्ये असतानाच मला प्रोफेशनल थिएटरमध्ये काम करण्याची संधी मिळाली. दिल्लीमध्ये त्या काळी फलिटिल थिएटर ग्रुप' खूपच प्रसिद्ध होता. मी कॉलेज संपवून थेट कॅनॉट प्लेस भागामध्ये जायचो.
 
शंकर मार्केटमध्ये आमच्या तालमी व्हायच्या. माझ्या अभिनयाची सुरुवात तर रामलीला कार्यक्रमातून झाली. पण, आपल्याला पुढे काय करायचं आहे, हे ठरवण्याच्या काळात माझ्या मनात एक प्रकारचा संघर्ष सुरू होता. अभ्यासात लक्ष द्यायचं की, जे अभिनयाचं क्षेत्र आवडतंय, त्यासाठी वेळ द्यावा, याबाबत संभ्रम होता. मी मूळचा कॉमर्सचा विद्यार्थी. खूप हुशार होतो. त्यामुळे, माझं कॉमर्समध्ये नक्कीच चांगलं करिअर होऊ शकलं असतं. मात्र, चित्रपटात काम करायचं असेल तर मुंबईला जावं लागणार होतं. मुंबईला जावं लागेल असं वाटत होतं. पण, मुंबईबद्दल काहीच माहिती नव्हती. अशा संभ्रमाच्या क्षणी वडिलांनी धीर दिला. दिल्लीतल्या अगदीच छोट्याशा भागात माझं बालपण गेलं. वडील छोटंसं दुकान चालवायचे. ते म्हणाले, फतुला मनापासून जे वाटतं, तेच कर.. पण, त्यासाठी काही मुदत ठरवून घे. जर तेवढ्या दिवसात तुला काम मिळालं तर तू तेच करत रहा. पण, जर काहीच जमलं नाही तर मात्र परत यावं लागेल..