दहा वर्षांमध्ये येणार आहे स्वस्ताईचा काळ

Sandyanand    11-Jul-2020
Total Views |
 
abc_1  H x W: 0
 
 
 
'रिथिंकएक्स ' या थिंक टँक गटाच्या अभ्यासातून निष्कर्ष 
 
अन्न, पाणी, वीज आणि डेटा दरमहा २५० डॉलरमध्ये
 
अशी असेल स्वस्ताई - या दशकाच्या अखेरपर्यंत  एक हजार मैल प्रवास, दोन हजार किलोवॉट तास ऊर्जा, सर्वंकष आहार, पिण्याचे स्वच्छ पाणी, राहण्यासाठी प्रतिव्यक्ती ५०० चौरस फुटांची जागा, संभाषण आणि शिक्षणाचा खर्च दरमहा २५० डॉलरपेक्षा कमी असेल आणि २०३५पर्यंत  तोही निम्मा होईल, असे भाकीत सेबा-आरबिब यांनी केले आहे. अर्थात, तंत्रज्ञान तयार असले, तरी ते वापरण्याची आणि अमलात आणण्याची इच्छा असेल तरच हे होऊ शकते, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
 
जगभरात सगळीकडे महागाई वाढत असताना स्वस्ताईचा काळ पुन्हा येईल याची कल्पना सध्याच्या स्थितीत कोणी करू शकणार नाही. पण तरीही येत्या काही वर्षांत जगात रास्त किमतीत सर्व सुविधा देणे श्नय असल्याचे 'रिथिंकएक्स ' (RethinkX) या थिंक  टँक गटाला वाटते. दारिद्र्यनिर्मूलनही होईल असे या गटाला वाटते. ते कसे श्नय होईल याची कारणमीमांसाही त्यांनी केली आहे.
 
जुन्या काळी खूप स्वस्ताई होती असे त्या पिढीतील माणसे सांगत असत. पण तेव्हा वेतनही कमी होते हे विसरून चालणार नाही. आज वेतन वाढले आहे आणि त्याप्रमाणात किमती. म्हणजे, महागाई तशी एकदम होत नसल्याचे दिसते. पण तरीही आजचे जीवनमान महाग असल्याचे मान्य करावे लागेल. त्यातही काही गोष्टी खूप महाग असतात तर बाकी त्या तुलनेत कमी महाग असतात. पण दरमहा २५० डॉलरमध्ये (सुमारे १८ हजार ६६१ रुपये) ऊर्जा (वीज), अन्न, पाणी आणि डेटा मिळाला तर तुम्हाला काय वाटेल? पण 'रिथिंकएक्स ' (RethinkX) या थिंक  टँक गटाचा त्यावर ठाम विश्वास आहे. अमेरिकेच्या सिलिकॉन व्हॅलीतील एक उद्योजक टोनी सेबा आणि गुंतवणूकदार जेम्स अरबिब यांचा हा थिंक टँक गट आहे. आपल्या या वैचारिक मांडणीसाठी हे दोघे सौरऊर्जेचे उदाहरण देतात. सौर ऊर्जेची किंमत एवढी कमी होईल असा अंदाज तज्ज्ञांना कधी आला नव्हता. सध्या, म्हणजे २०२०मध्ये सौरऊर्जेच्या किमतीत एेंशी टक्क्यांपेक्षा जास्त घट झाल्याचे ते सांगतात. मात्र, सेबा आणि अरबिब यांनी हा अंदाज केला होता आणि तो अचूक ठरला आहे. आताही जीवनावश्यक असलेल्या अनेक वस्तूंवरील खर्च कमी होत जातील, अर्थव्यवस्थेत बदल होत जातील आणि नागरिक दारिद्र्यातून बाहेर येतील, असे या दोघांचे म्हणणे आहे. 'रिथिंकिंग  ह्युमॅनिटी' या शीर्षकाने प्रसिद्ध केलेल्या एका अहवालात सेबा आणि अरबिब म्हणतात, की सुमारे दहा हजार वर्षांपूर्वी माणसाने शेतीला सुरुवात केली आणि नंतर शहरे अस्तित्वात येऊ लागली.
 
सध्याचा काळ हा मानवी संस्कृतीतील परिवर्तनाचा काळ आहे. हे परिवर्तन अत्यंत वेगवान, खोलवर आणि सर्वंकष असून, त्याचा लाभ सर्वांना मिळणार आहे. प्रगतीचा वेग वाढत असल्याने वाहतूक, अन्न, ऊर्जा, साधनसामग्री आणि माहितीसारख्या महत्त्वाच्या क्षेत्रांतील खर्च दहापटींनी कमी होण्याचा अंदाज आहे. येत्या दहा ते १५ वर्षांत काहीशे डॉलरमध्ये आरामात जगण्याचे सर्वांचे अमेरिकन स्वप्न प्रत्यक्षात येईल, असे या अहवालात नमूद करण्यात आले आहे. वाहतुकीच्या क्षेत्रात खूपच स्वस्ताई येणार असल्याचा अंदाज करताना या दोघांनी अन्न, पाणी, वीज आणि डेटा दरमहा २५० डॉलरमध्ये २०१७मधील वाहतुकीसंदर्भातील अहवालाचा आधार घेतला आहे. लवकरच स्वत:च धावणाऱ्या (सेल्फ ड्रायव्हिंग) मोटारी रस्त्यांवर येतील आणि त्यांची सेवा एवढी स्वस्त असेल, की भविष्यात अमेरिकेत स्वत:ची मोटार घेण्याला काही अर्थ उरणार नाही. या स्वयंचलित मोटारी वाहतुकीची सोय करतील. यात विद्युत मोटारींचीही (इले्िनट्रक कार्स) भर पडणार असून, या गाड्या भाड्याने घेऊन वापरणे फार स्वस्त असेल. सध्याच्या अंदाजापेक्षा अशा गाड्या फार लवकर रस्त्यांवर धावायला लागतील.
 
रोबोचलित इले्िनट्रक टॅ्नसींमुळे अमेरिकेत लोकांना स्वत:ची मोटार घेण्याची गरज पडणार नाही आणि त्यामुळे या देशातील कुटुंबे दरवर्षी पाच हजार डॉलरपेक्षा जास्त बचत करू शकतील. मात्र, अशा स्वयंचलित मोटारींना रस्त्यावरून प्रवासाची परवानगी लवकर मिळण्याची श्नयता नसल्याचे काही तज्ज्ञांना वाटते. मात्र, अमेरिकेत सरकारने अशा मोटारींना परवानगी देण्यास विलंबकेला तर हे तंत्रज्ञान दुसरे देश वापरायला लागतील, असे सेबा यांचे म्हणणे आहे. अशा मोटारी वेळेत परवानगी मिळून धावायला लागल्या, तर २०३०पर्यंत मोटारचालक आणि मोटार चालविण्याच्या परवान्यांची गरज उरणार नाही. कारण या स्वयंचलित मोटारी मानवी चालकांपेक्षा जास्त सुरक्षित असतील. त्यांचे तंत्रज्ञान अत्याधुनिक असल्याने दुर्घटनांची श्नयता नसेल, असेही ते सांगतात. बांधकाम होईल स्वस्त - अमेरिकेतील मोटारींच्या वाढत्या संख्येमुळे निर्माण होणारे प्रश्नही इले्िनट्रक कार्सच्या वापरामुळे संपतील असे सेबा म्हणतात. मोटारी उभ्या करण्यासाठी पार्किंगच्या जागेची गरज भासते आणि त्यासाठी मोठी मैदाने वापरावी लागतात.
 
सध्याच मोठ्या शहरांमध्ये पार्किंगची समस्या भेडसावत असल्याकडे ते लक्ष वेधतात. पण इले्िनट्रक आणि रोबोचलित गाड्यांमुळे खासगी गाड्या घेणे जवळपास बंद होऊन पार्किंगसाठी वापरली जाणारी मैदाने मोकळी होतील. या जागांवर निवासी इमारती उभारता येऊन निवाऱ्याचा प्रश्न सोडविता येईल. मोठ्या प्रमाणावरील हे बांधकाम स्वस्तसुद्धा असेल. इमारती बांधताना त्यात स्ट्र्नचरल प्लायवूडचा वापर करता येऊन खर्च आणखी कमी करता येईल. सौरशक्तीद्वारे वीजपुरवठा केल्यास, विजेवरील खर्च जवळपास संपतो, असे त्यांनी सांगितले. प्रगतीसाठी ऊर्जेची सर्वाधिक आवश्यकता असते.