रोज ५ कप कॉफी आणि परस्परांवर विश्वास

11 Jul 2020 12:22:54
 
 
 
 
नॉर्वेतील लोकांचा आनंदी राहण्याचा मार्ग 
 
नॉर्वेतील लोक आनंदी असण्यासाठी कोणता उपाय करतात? ते रोज ५ कप कॉफी पितात आणि एकमेकांवर विश्वास ठेवतात. कॉफीशिवाय नॉर्वेची गती जणू थांबेल. मागच्या वर्षीच सरासरी प्रती व्य्नती ९ किलो कॉफी आयात केली गेली आहे. कॉफीच्या माध्यमातून लोकांना एक दुसऱ्याबरोबर वेळ घालविण्याची संधी मिळते. येथून विश्वासाचा प्रवेश होतो. पण, असे समजू नका की कॉफीमुळेच विश्वास येतो. या विश्वासात साक्षरता आणि समानता हे साखरेप्रमाणे विरघळले आहेत. येथील अनेक कॉफी हाऊसमध्ये तुम्हाला समानतेचे दृश्य दिसेलही. असू शकते की तुमच्या शेजारच्या टेबलावर पंतप्रधान एर्ना सोलबर्ग किंवा अब्जाधीश बिझनेसमन बियान क्योस बसलेले दिसून येतील. नॉर्वेच्या लोकांच्या बाबतीतही असेच आहे. येथील ट्रेन्समध्ये फस्टक्लास  डबा नसतो हे याच समानतेचे निदर्शक वकिली करते.
 
वर्तमानपत्रांचे स्वातंत्र्यसुद्धा समृद्धी आणि आनंद वाढविण्यात मदत करणारे ठरते. २०१८ मधील वल्ड प्रेस फ्रीडम इंडे्नसमध्ये हा देश नंबर एकवर होता. पहिल्या नजरेत कदाचित तुम्हाला प्रेसच्या या स्वातंत्र्याचा संबंध आनंदीपणाशी असलेला दिसून येतही नसेल. पण, तेथील सरकारी संस्थांना जबाबदार आणि पारदर्शी बनविण्याचे श्रेय त्यांनाच जाते. ५३ लाख लोकसंख्या असलेल्या या देशाची अर्थव्यवस्था इंजिन ऑइल आणि गॅस रिझव्र्हमधून चालते. त्यातून येणाऱ्या पैशांचा एक भाग सरकारी पेंशन फंडामध्ये जमा केला जातो, जो जगातील सर्वात मोठा फंड आहे. १९ सप्टेंबर २०१७ रोजी या फंडाने पहिल्यांदा एक लाख कोटीं (सुमारे ७१ लाख कोटी रुपये) चा स्तर गाठला होता. ७२ देशांमध्ये हा पैसा गुंतविला आहे. आनंदाचे वातावरण निर्माण करण्यात या पैशांचीही भूमिका आहे. पण असे नाहीये की येथे सर्व काही चांगलेच आहे. येथील लोकांना समस्यांशी झुंजावे लागते. ड्रगची समस्या त्यापैकी एक आहे. युरोपियन मॉनिटरिंग सेंटर फॉर ड्रग्ज अँड ड्रग अ‍ॅडि्नशनच्या रिपोटनुसार येथे ड्रग्जमुळे मरणाऱ्यांची संख्या युरोपातील बाकी देशांच्या तुलनेत ४ पट आहे. याला समाप्त करण्यासाठी सरकार काम करत आहे. आशा आहे की आज नाही, तर उद्या नॉर्वे या समस्येवर मार्ग शोधेल. जो येथील आनंदाला आणखी वाढविण्याचा मार्ग असेल.
Powered By Sangraha 9.0