चेरिपुंजीत ढगांना पवित्र मानून केली जाते त्यांची पूजा

10 Jul 2020 11:33:54
 
 
 
हिरवळ, सुंदर झरे आणि विविध आकारांचे धबधबे हे येथील आणखी एक आकर्षण आहे. नोहकलीकाई, सेवन सिस्टर, कावा, वाकवा हे त्यातील काही प्रमुख धबधबे. मावासमइ आखाह गुहा पर्यटकांना आकर्षित करणाऱ्या आहेत.मेघालयातील चेरापुंजी हे ठिकाण देशातील सर्वाधिक पाऊस पडणारे म्हणून प्रसिद्ध असले तरी, येथेही नोव्हेंबरमध्ये पाण्याची चणचण निर्माण होते, असे सांगितले तर कुणाचा विश्वास बसणार नाही.
 
मात्र खासी पर्वतरांगात वसलेले हे सुंदर स्थळ सोहरा वा चुर्रा नावानेही ओळखले जाते. या ठिकाणी जाण्यासाठी मार्च ते मे आणि जून ते सप्टेंबर हा उत्तम काळ मानला जातो. या भागात मुख्यत्वे खासी व जानियास आदिवासी लोकांची वस्ती आहे. येथील लाइव्ह ब्रिज स्थानिक बायो इंजिनीअरिंगचा उत्तम नमुना मानला जातो. येथे रबराची झाडे मोठ्या प्रमाणात आहेत आणि त्याची मुळे लांबवर पसरतात. त्यामुळे नदीकाठी असलेल्या झाडांची मुळे एकत्र करून हे लोक पूल तयार करतात. ही मुळे वाढत राहतात आणि त्यामुळे पूल अधिक मजबूत होतात. असे दोन मजली पूल येथे पाहायला मिळतात. येथे ढग हे पवित्र मानले जातात व या ढगांसाठी लोकगीते गाऊन नृत्ये केली जातात. पर्यटक या कार्यक्रमाचा आनंद घेऊ शकतात. येथील इको पार्कमध्ये सुंदर आणि अनेक प्रकारची आर्किड फुले पाहता येतात. येथील पोर्क आणि राईस डिशेस अतिशय चविष्ट असतात. त्याबरोबर खास तांदूळ आणि विविध भाज्या वापरून केलेला सोहरा पुलाव चविष्ट असतो.
Powered By Sangraha 9.0