निसर्गस्नेही टेराकोटा वस्तूंचा वापर करा

01 Jul 2020 13:02:08




कोरोनामुळे आता गो-ग्रीन हा आता नुसता ट्रेंड राहिलेला नाही तर आपण सर्वांचीच जीवनशैली आता गो ग्रीन झाली पाहिजे अशी वेळ आली आहे. गो ग्रीन ही संकल्पना या टेराकोटाच्या वापरामुळे इंटिरिअर डिझाइनिंगच्या माध्यमातून साकारली जाऊ शकते. निसर्गनिर्मित उपलब्ध साधनांचा उपयोग, वापर करून तसेच निसर्गाची जोपासना करून जे काही इंटिरिअर करण्यासाठी आवर्जून वापरावे, असं ठरवणं शक्य होईल ते ते सर्वकाही वापरावं. 


१. टेराकोटा वस्तूंचा घरातील किंवा घराबाहेरील बागकामासाठी अधिक चांगल्या प्रकारे उपयोग केला जातो. घरातील अथवा बाहेरील जमिनीवरच्या कुंड्या, हँगिंग पॉट्स, पॉट्स वीथ कॉर्नर स्टँड अशा विविध पॉट्सचा वापर इनडोअर, आऊटडोअर लँडस्केपसाठी करता येतो.  

२. इंटिरिअरच्या दृष्टिकोनातून वॉल माऊंटेड फ्रेम्स, म्युरल्स, स्कल्पचर्स, डेकोरेटिव्ह अँटिक पिसेस, शो-पिसेस, पॉट्स व पॉटरी अशा वस्तूंची आपल्याला हव्या त्या आकारांत, रंगांत, रूपांत, निरनिराळ्या डिझाइनमध्ये निर्मिती करता येऊ शकते. टेराकोटा वापरून तयार केलेल्या वस्तूंच्या किमती तसेच त्या बनविण्यासाठी येणारा खर्चही फारच कमी असतो. याच वस्तू, लाकूड, काच, स्टोन, मेटल यापैकी कोणत्याही मटेरिअलमध्ये बनवल्या तर टेराकोटाच्या तुलनेने त्यांची किंमत व बनविण्याचा खर्च तसेच बनविण्यासाठी लागणारा वेळ सर्वच जास्त असणार आहे. 

३. एकाच डिझाइनच्या, आकाराच्या अनेक वस्तू एकप्रकारेच मोठ्या संख्येत बनविण्यासाठी त्याप्रमाणे एखादा साचा तयार करून त्या साच्याप्रमाणे एकसारख्या सर्व वस्तू बनवता येऊ शकतील. तयार होणाऱ्या टेराकोटाच्या वस्तूंवर हवातसा रंग चढवता येऊ शकतो. नैसर्गिक रंग, ऑइलपेंट्स, अ‍ॅक्रेलिक बेस पेंट्स, गेरू इत्यादी कापडाच्या बोळ्यांनी, ब्रशनी अथवा स्प्रे गन वापरूनदेखील रंगवता येतात. हस्तकलेच्या माध्यमातून या वस्तूंवर बाहेरून निरनिराळी डिझाइन्स बनवता येऊ शकतात. त्यावर सुंदर नक्षीकाम, कोरीव काम करता येतं. टेराकोटाच्या माध्यमातून लहान आकाराचे हस्तशिल्प हस्तकलेतील उत्कृष्ट नमुने बनविले जातात. छोट्या खेळण्यांबरोबर लहान लहान पणत्या, दिवे, आकाशकंदील, जमिनीवर ठेवण्यासाठी फुलझाडांसाठी कुंड्या, काही लोंबकळणाऱ्या कुंड्या, लहानमोठ्या आकारांचे पॉट्स, असे असंख्य वस्तूंचे प्रकार या टेराकोटामध्ये बनविले जातात.
Powered By Sangraha 9.0