ये है आफ्रिका!

Sandyanand    01-Jul-2020
Total Views |


  Africa_1  H x


आफ्रिकेमध्ये पशुधनाला फार महत्त्व आहे. तिथे मोटरसायकलीवर गाय बसवून नेली जाते हे पाहून झीट आली असेल, तर दुसरीकडे एका कारमध्ये गायीला कोंबण्यासाठी सुरू असलेली पराकाष्ठा पाहून काय अवस्था होईल तुमची?


जगाच्या पाठीवर अत्यंत डबडा गाड्या आणि त्यांच्यातून केली जाणारी अचाट वाहतूक यासाठी कोणता देश प्रसिद्ध आहे? या प्रश्नाच्या उत्तरादाखल तुम्हाला भारत असं उत्तर सुचू शकेल. आपल्या ग्रामीण भागात, खासकरून उत्तर भारताच्या ग्रामीण भागात अशा प्रकारची अचाट वाहतूक होत असते. 

फेविकॉलची राजस्थानात शूट केलेली बसची जाहिरात आठवते की नाही? पण, आपल्यापेक्षा अफाट वाहतूक रोमानियामध्ये चालते. या देशाला आता आफ्रिकेची टक्कर मिळायला सुरुवात झालेली दिसते. सतत लोभी राज्यकर्त्यांच्या ताब्यात राहिलेला आणि टोळ्यांमध्ये विखुरलेला आफ्रिका हा खंड शापित खंड आहे. जगाच्या पाठीवर अनेक सुधारणा घडल्या असल्या तरी आफ्रिकेतले अनेक निसर्गसंपन्न देश मानवनिर्मित दारिद्र्यात खितपत पडलेले आहेत. जिथे साध्यात साध्या सुविधांचा अभाव असतो तिथे लोक आहेत त्या सुविधांचा पैसावसूल वापर करून घेताना दिसतात.

इथे एका व्हॅनसारख्या वाहनाच्या मागच्या डिकीत केवढं सामान बसवलंय ते पाहा. त्यावर एकीकडे एकजण आडवा झालाय, दुसरीकडे एकजड मोटरसायकलीवर स्वार असल्याच्या अवस्थेत आत बसवण्यात आलेला आहे. आफ्रिकेमध्ये पशुधनाला फार महत्त्व आहे. तिथे आजही माणसांची श्रीमंती पशुधनातच मोजतात आणि लग्नाच्या वेळी कॅटल म्हणजे पशुधनाचीच देवाणघेवाण होते. तिथे मोटरसायकलीवर गाय बसवून नेली जाते हे पाहून झीट आली असेल तर दुसरीकडे एका कारमध्ये गायीला कोंबण्यासाठी सुरू असलेली पराकाष्ठा पाहून काय अवस्था होईल तुमची?