शिंगाडा या फळात आपले रक्त शुद्ध करण्याची क्षमता असते...

Sandyanand    01-Jul-2020
Total Views |
shingada_1  H x


वरून काळं आणि आतून पांढरं असणाऱ्या शिंगाडा या फळात रक्तशुद्ध करण्याची क्षमता असते. शिंगाडा हे फळ सूकवून सोलल्यानंतर त्यापासून पीठ तयार केलं जातं. या शिंगाड्याच्या पीठाचा उपवासाचे पदार्थ बनविण्यासाठी उपयोग केला जातो. कावीळ झालेल्या व्यक्तींनी हे फळ कच्च किंवा त्याचा ज्यूस करून प्यावा, कावीळ लवकर बरा होतो.

पोटाच्या सर्व विकारांवर शिंगाडा हे फळ गुणकारी आहे. शिंगाड्यामुळे केसांचं आरोग्य सुधारतं. यात केसांसाठी आवश्यक असलेले पोटॅशिअम, झिंक, ब व ई जीवनसत्त्व असतं. या फळ नियमित खाल्ल्याने वजन कमी होण्यास मदत होते. गोवर झालेल्या लोकांनी शिंगाडा पाण्यात उकळून ते पाणी ६ ते ९ दिवस घेतल्यास आराम पडतो. भूक लागत नसल्यास हे फळ कच्चं किंवा ज्यूसमधून घ्यावं. भूक वाढते. 
 
शरीरात उष्णता वाढल्यास शिंगाड्याचा रस प्यावा. उष्णता कमी होते. शरीरावर मुका मार लागून सूज आल्यास त्यावर शिंगाड्याच्या सालीची पावडर करून ती पाण्यातून लावल्याने लवकर आराम मिळतो. खोकला झाल्यास याची पावडर करून ती पाण्यातून किंवा ज्यूसमधून घेतल्यास कफ बाहेर पडण्यास मदत होते. या फळामुळे गरोदरपणात वाढणारा उच्च रक्तदाब नियंत्रित राहण्यास मदत होते.