घरातील प्रत्येकालाच पाणी वाचवण्याची शिस्त लावायला हवी

Sandyanand    01-Jul-2020
Total Views |

water_1  H x W:


मास्टर स्टॉप कॉक व पाण्याच्या इनलेटचा वापर होणारी अजून एक महत्त्वाची रूम म्हणजे टॉयलेट आणि बाथरूममध्ये आपल्याला शॉवरसाठी कनेक्शन लागतं. त्याचबरोबर काहींना बादलीत पाण्याने स्नान करण्याची सवय असल्यास स्पूटला कनेक्शन लागतं. या दोन्ही ठिकाणी आपल्याला थंड आणि गरम पाणी लागतं. आपण कन्सिल्ड प्लम्बिंग करतो तेव्हा या दोन्ही पाण्यांचे पाइप्स वेगळे असणं गरजेचं असतं. हे पाइप्स मुख्यत्वे गॅल्वनाइज्ड आयर्न म्हणजे ॠक या मटेरिअलचे असतात.

हल्ली सीपीव्हीसी म्हणजेच अत्यंत उच्च प्रतीच्या प्लॅस्टिकचे पाइप्स उपलब्ध आहेत. ज्या जी. आय. च्या पाइप्समध्ये गरम पाण्याचा प्रवाह असतो त्याची खास काळजी घेणं गरजेचं असतं. या पाइपला बाहेरून ब्लॅक जपान नावाच्या एका केमिकलचा कोट देणं आवश्यक असतं. नंतर त्यावर काथ्याचं आवरण दिलं जातं आणि सर्वात शेवटी या पाइपभोवती प्लॅस्टिकचं आवरण दिलं जातं. गरम पाण्याच्या प्रवाहामुळे बाष्पीभवन होण्याचा संभव असतो. ज्यामुळे पाइपच्या बाहेर पाण्याचा थर येऊन कालांतराने तो पाइप खराब होण्याची शक्यता असते. या सर्वाची भीती वाटून काही कन्सिल्ड प्लम्बिंग करायचं टाळतात आणि ओपन प्लम्बिंगला प्राधान्य देतात आणि बाथरूमची पूर्ण रयाच जाते. 

मात्र ही सर्व काळजी घेतली तर कन्सिल्ड प्लम्बिंग करायला काहीच हरकत नसते, ज्याने बाथरूमचं साैंदर्य आहे तसच राहतं. इनलेटबद्दलच्या या सर्व गोष्टी ध्यानात ठेवून आपण प्लम्बिंग डिझाइन केलं तर आपण त्याचा पुरेपूर फायदा घेऊ शकतो आणि आपण मोठ्या प्रमाणावर पाण्याची बचत करून जलसंवर्धन करू शकतो.