कोरोनाच्या विषाणूला घाबरू नका; सावधगिरी बाळगा

01 Jul 2020 13:02:15


corona_1  H x W


काळजी करू नका : काळजी घ्या!
सध्या फेसबुकवर एक पोस्ट व्हायरल होत आहे. ही पोस्ट सिएटलच्या एलिझाबेथ शेनेडर यांची आहे. कोरोना व्हायरस कोविड-१९ च्या तावडीत सापडल्यानंतर व बरे झाल्यानंतर त्यांनी आपले अनुभव लिहिले आहेत...


एलिझाबेथ लिहितात, कोणीही मोठ्या सुलभपणे त्याच्या तावडीत सापडू शकतो. मी कोणाच्या घरी एका पार्टीत गेले होते. तेथे कोणाला खोकला किंवा ताप नव्हता. नंतर समजले की, पार्टीत येणारे ४०% लोक तीन दिवसांच्या आत आजारी पडले. जरी मी आधीपासूनच अनेक वेळा हात धूत होते, पण माझ्या दृष्टीने त्यापासून वाचण्याचा परिणामकारक उपाय मनुष्याच्या संपर्कात येण्यापासून दूर राहाणे हाच आहे. त्याची लक्षणे डोकेदुखी, ताप आणि थकवा यांच्या रूपातही दिसतात. जी शरीर आणि वय यावरही अवलंबून असतात. 

वरिष्ठ पल्मोनरी एक्सपर्ट डॉ. विवेक नांगिया सांगतात, खूप आवश्यक आहे की प्रवास कमी करा. खोकला, ताप, सर्दी असेल तर वेगळे राहा. खोकला आला किंवा शिंक आली तर टिश्यू पेपरमध्ये करा. आणि त्याला डस्टबिनमध्ये टाका. पाणी पीत राहा. सतत डोळे, नाक किंवा तोंड यांना स्पर्श करू नका.

फोर्टिस हॉस्पिटलशी निगडीत डॉ. राहुल भार्गव यांच्यानुसार, हा व्हायरस सर्वांसाठी प्राणघातक नाहीये. पण तपासणी आवश्यक आहे. घरगुती उपाय रोगप्रतिकारक्षमता वाढविण्यासाठी मदत करू शकतात. पण व्हायरसला मारण्यासाठी नाही. किडनी, हृदय, अस्थमा आणि कँसरच्या रोग्यांनी विशेष लक्ष द्यावे. अतिशय आवश्यक असल्यासच घराबाहेर जा.


corona_1  H x W


आता सुमारे १३ दिवस झाले आहेत आणि मागील ७२ तासांपासून ताप कमी आहे. आरोग्य विभाग, लक्षणे सुरू झाल्यानंतर सुमारे ७ दिवस किंवा ताप कमी झाल्यानंतर ७२ तास वेगळे राहण्याचा सल्ला देत आहे. म्हणून मी आता वेगळी राहात नाही. पण गर्दीत जाण्यापासून दूर राहात आहे. मी हॉस्पिटलमध्ये अ‍ॅडमिट झाले नाही. डॉक्टर सगळ्यांना अ‍ॅडमिट करत नाहीत. याची वाढ होण्याचे प्रमुख कारण तपासणीची कमतरता आहे. त्यामुळे लोक त्याला सामान्य ताप किंवा फ्लू प्रमाणे मानत आहेत. जो या व्हायरसला पसरवित आहेत. श्वासासंबंधी माझी लक्षणे जास्त न बिघडण्याची आणखी दोन कारणे असू शकतात. मी नियमित नेजल स्प्रे वापरत होते आणि जलनेती सुद्धा करत होते. त्यामुळे सायनस स्वच्छ राहिला आणि फुप्फुसांवर परिणाम झाला नाही. विशेष म्हणजे तपासणीत उशीर करू नका. ६० वर्षांपेक्षा जास्त किंवा कमकुवत रोगप्रतिकारशक्ती असणाऱ्यांनी सावध राहा.  
Powered By Sangraha 9.0