कार लाँड्रीद्वारे बना, यशस्वी व्यावसायिक

Sandyanand    01-Jul-2020
Total Views |


car laundry_1  


कार लॉंड्री सुरू करण्यासाठी व्यक्तीकडे अनुभव आणि मेकॅनिकल डिग्री शिवाय आर्थिक मजबूती हवी. अर्थात पैशांची गरज भागविण्यासाठी कर्ज घेऊ शकता. दहावीनंतर मेकॅनिकलमध्ये डिप्लोमा करता येतो. बारावी पास असणारे विद्यार्थी मेकॅनिकलमध्ये डिग्री घेऊ शकतात.


मोठ्या मोठ्या वर्कशॉपमध्ये कार ड्रायक्लीनिंगलाच कार लाँड्री असं म्हणतात. कार लाँड्रीमध्ये कारच्या आतील आणि बाह्य बाजूस शॅम्पू वॉशिंग, क्लीनिंग, ड्राय क्लिनिंग, ट्रीम क्लिनिंग, रबिंग आणि पॉलिश केलं जातं. कार लॉंड्रीमध्ये देण्याचा अर्थ असा आहे की, त्याच्या सगळ्या पार्ट्सची स्वच्छता करणे. सगळे पार्ट्स म्हणजे आतील सीट, दरवाजा, खिडकी आदी ड्राय वॉश करणे. यामुळे गाडी एकदम नवी दिसते.

कशी सुरूवात कराल? 
कार लॉंड्री सुरू करण्यासाठी व्यक्तीकडे अनुभव आणि मेकॅनिकल डिग्री शिवाय आर्थिक मजबूती हवी. अर्थात पैशांची गरज भागविण्यासाठी कर्ज घेऊ शकता. त्यासाठी तुम्हाला बँकेला एक प्रोजेक्ट द्यावं लागतं. मग बँक ते बघून कर्ज देते. कार लाँड्री सुरू करण्यासाठी कमीत कमी दोन लाख रूपये लागतात. साधारण एक लाख रूपये रँपला लागतात, ज्यावर लिट बनवले जाते. त्यावर गाडी चढवून शॅम्पू आणि वॉश केले जाते. कार लाँड्री सुरू करण्यापूर्वी नगर पालिकेकडून प्रदूषण नियंत्रण प्रमाण घ्यावं लागतं. तसंच वॉशिंग स्टेशन लावण्यासाठी खड्डा तयार करावा लागतो. खड्डा तयार करण्याने त्यामध्ये घाण जाते. त्यामध्ये एक वॉटर प्युरिफायर बसावला जातो. जे पाणी स्वच्छ करते. पोर्टेबल स्टेशनही हल्ली उपलब्ध आहेत. याची किंमत साधारण दोन लाख आहे. याची सेवा कुठेही देता येते. 

पात्रता
दहावीनंतर मेकॅनिकलमध्ये डिप्लोमा करता येतो. बारावी पास असणारे विद्यार्थी मेकॅनिकलमध्ये डिग्री घेऊ शकतात. अ‍ॅक्सेसरीज कार लाँड्री सुरू करण्यासाठी वर्क कॅपॅसिटी आवश्यक आहे. कमीत कमी चार मेकॅनिक हवे. रँप आणि लिटबरोबरच टाकी, कंप्रेसर, वॉशर पाइप, एयर पाइप आणि एयर पाइप यांचीही गरज असते. कारला आतपर्यंत ड्रायक्लीन केलं जातं. त्यासाठी सगळ्या अ‍ॅक्सेसरीजची गरज पडते. जर तुम्ही तुमच्या ग्राहकांना सर्वोत्तम सेवा देऊ इच्छित असाल तर अ‍ॅक्सेसरीज वाढवा.