पुस्तकांचा केवढा हा अपमान!

Sandyanand    05-Jun-2020
Total Views |


     books_1  H x W:  


किंडलसारख्या सुटसुटीत साधनाच्या साह्याने वाचन करणं सोपं बनून जातं. त्यामुळे पुस्तकांना एकेकाळी जे ग्लॅमर होतं, ते आता राहिलेलं नाही. पुस्तकं सजावटीपुरती राहिलेली आहेत. मात्र, इथे जी दोन चित्रं दिसतायत, तो पुस्तकांचा सरळसरळ अपमानच आहे.


दिवाणखान्यात पुस्तकांची कपाटं, पुस्तकांसाठी स्वतंत्र कपाटं ही सुसंस्कृत घरांची ओळख होती एकेकाळी. अजूनही आहे. वाचनाची आवड असलेल्या अनेकांना पुस्तकांसाठी स्वतंत्र खोली करून आपण त्यात शांतपणे पुस्तकं वाचत बसलो आहोत, असं कल्पनाचित्र किंवा स्वप्नचित्र रंगवायला फार आवडतं. मात्र आजकाल पुस्तकांना फार वाईट दिवस आलेले आहेत. 

पुस्तकांची जागा वेगवेगळ्या वाचनसाधनांनी घेतली आहे. मुळात ज्यांना पुस्तकांच्या वाचनाचं वेड नव्हतं, त्यांच्यासाठी समाजमाध्यमं, खासकरून फेसबुक आणि व्हॉट्सअ‍ॅप ही वाचनाची हौस भागवण्याचं काम करतायत. त्यात सकस मजकुराऐवजी कचराच खूप भरलेला असतो, पण तरीही त्याची अनेक लोकांना आवड असते. ज्यांना पुस्तकं वाचण्याचा नाद होता, त्यांना पुस्तकांसाठी लागणारी जागा, सतत पुस्तकं सोबत घेऊन फिरणं याचा ताप होत होताच. त्याऐवजी किंडलसारख्या सुटसुटीत साधनाच्या साह्याने वाचन करणं सोपं बनून जातं. त्यामुळे पुस्तकांना एकेकाळी जे ग्लॅमर होतं, ते आता राहिलेलं नाही. 


books_2  H x W:

पुस्तकं सजावटीपुरती राहिलेली आहेत. मात्र, इथे जी दोन चित्रं दिसतायत, तो पुस्तकांचा सरळसरळ अपमानच आहे. एकीकडे एका हॉटेलने पाटी लावली आहे की पुस्तकं फक्त प्रदर्शनापुरतीच मांडलेली आहेत, ती वाचण्यासाठी उपलब्ध नाहीत. हे एखादा खाद्यपदार्थ फक्त पाहण्यासाठीच ठेवण्यासारखं आहे. दुसरीकडे पुस्तकांनी भरलेलं शेल्फ दिसावं आणि जागाही कमी लागावी म्हणून क्रूरपणे पुस्तकांची हत्या करून त्यांचा कण्याचा म्हणजे स्पाइनचा भाग तेवढा ठेवलाय कपाटात!