अंतरिक्षाच्या पार्श्वभूमीवर अ‍ॅपद्वारे काढा सेल्फी

Sandyanand    05-Jun-2020
Total Views |

selfi_1  H x W:


लोक वेगवेगळ्या ठिकाणी सेल्फी काढतात. पण चक्क अंतरिक्षाच्या पार्श्वभूमीवर सेल्फी काढता आली तर? अमेरिकेच्या 'नासा' ने यासाठी अ‍ॅप उपलब्ध केले आहे. त्यातून अंतरिक्षाच्या पार्श्वभूमीवर सेल्फी काढण्याची इच्छा पूर्ण होऊ शकेल..


तुम्ही तर रोजच सेल्फी काढत असाल. पण आता तुम्हाला पृथ्वीपेक्षा दूर अंतरिक्षात सेल्फी काढण्याची संधी आहे. अमेरिकी अंतरिक्ष एजन्सी 'नासा'ने एक नवीन अ‍ॅप लाँच केले आहे. याच्या माध्यमातून तुम्ही खास सूटबरोबर अंतरिक्षातील अद्भुत स्थानांवर सेल्फी घेऊ शकता. इतकेच नाही तर या अ‍ॅपच्या माध्यमातून आपण आपल्या सौरमंडलाच्या बाहेरच्या जगाचे व्हर्च्युअल भ्रमण करू शकता. म व्हर्च्युअल रिअ‍ॅल्टी (वीआर) अ‍ॅपच्या माध्यमातून नासा तुम्हाला 'ट्रेपिस्ट-१' ग्रहप्रणालीची सहल घडवून आणेल. आपल्या स्पिट्झर स्पेस टेलीस्कोपच्या लाँचिंगला १६ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल त्याचा उत्सव साजरा करण्यासाठी नासाने हा पुढाकार घेतला आहे.

 या अ‍ॅपच्या माध्यमातून सेल्फी घेणे खूप सोपे आहे. तुम्हाला फक्त सेल्फी घ्यायची आहे. त्यानंतर बॅकग्राऊंड निवडायची आहे आणि त्यानंतर तुम्ही त्याला सोशल मीडियावर अपलोड करू शकता. हे अ‍ॅप अँड्रॉइड आणि आयओएस दोन्ही प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहे. या अ‍ॅपवर तुम्हाला फोटोच्या मागील विज्ञानाची माहितीही मिळेल, ज्याला स्पिट्झर द्वारे काढण्यात आले आहे. त्याच्या व्यतिरिक्त अंतरिक्षाच्या व्हर्च्युअल प्रवासात तुम्ही 'ट्रेपिस्ट-१'चे भ्रमण करू शकता. 'ट्रेपिस्ट-१' सौरमंडलाबाहेरील एकमात्र ग्रहांचा समूह आहे, ज्यामध्ये पृथ्वीच्या आकाराचे सात ग्रह अस्तित्वात आहेत. या ग्रहांना शोधण्यासाठी स्पिट्झरने खूप मोठी भूमिका पार पाडली. आणि त्याच्याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारावरच वैज्ञानिकांना या ग्रहांच्या निर्मितीचे संयोजन समजून आले. 

'ट्रेपिस्ट-१' सिस्टीमचे ग्रह पृथ्वीपासून इतके दूर आहेत की, त्यांना टेलीस्कोपच्या माध्यमातून पाहणे शक्य नाही.टेलिस्कोपला १६ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल नासाने हा उपक्रम सुरू केला आहे. २५ ऑगस्ट २००३ रोजी स्पिट्जर स्पेस टेलीस्कोप लाँच केला होता. हे अ‍ॅप अँड्रॉइड व आयओएस दोन्ही प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहेत. या अ‍ॅपवर फोटोच्या मागील विज्ञानाची माहिती मिळेल ज्याला स्पिट्झर द्वारा काढण्यात आले आहे.


अ‍ॅपच्या माध्यमातून कोणीही यूजर अंतरिक्षाच्या अंधारात दूरवरच्या ताऱ्यांच्या हलक्या प्रकाशात सातपैकी पाच ग्रहांचे भ्रमण करू शकतात. स्पिट्झरच्या यूट्यूब पेजवर ३६० डिग्री व्हीडियोसुद्धा उपलब्ध आहेत. ज्यामुळे लोक आपल्या कॉम्प्युटर स्क्रीनवर किंवा स्मार्टटफोनवर हा अनोखा अनुभव मिळवू शकतात. स्पिट्झर स्पेस टेलीस्कोप २५ ऑगस्ट, २००३ मध्ये लाँच केला होता.