पर्ल किंवा फ्रुट फेशियल चेहऱ्यासाठी उपयुक्त

Sandyanand    05-Jun-2020
Total Views |

facial_1  H x W


उन्हाळ्याच्या दिवसात एक किंवा दोन वेळा डायमंड, पर्ल किंवा फ्रुट फेशियल अवश्य करायला हवं. हे सगळ्या प्रकारच्या त्वचेसाठी उपयुक्त ठरते.


खूप उन्हाळ्यात आपली त्वचा रूक्ष होते. पण घाबरू नका. पण अशी अनेक फेशियल्स असतात जी केवळ आपल्या त्वचेला सुरक्षित ठेवतात असं नाही तर चेहऱ्यावर तेज आणतात. उन्हाळ्यात अतिनील किरणांमुळे त्वचेवर काळेपणा येतो, ती आकसल्यासारखी दिसते, तिच्यावर छोटे छोटे पुरळ येतात. काही खास उपाय जाणून घेऊ, ज्यामुळे आपल्या त्वचेची छान काळजी घेतली जाईल...  

जर त्वचा काळवंडली असेल तर अल्फा हाइड्रॉक्सि अ‍ॅसिड म्हणजे एएचए फेशियल्स हा खूप चांगला पर्याय आहे. यामध्ये फळं आणि फुलांचा समावेश असतो. 

अँटी ऑक्सिडंट आणि प्रदूषणाशी लढण्यासाठी रफेशियल्सचा वापर करा. यामुळे चेहऱ्यावर प्रदूषणाचा होणारा परिणाम टाळता येतो. 

किशोर आणि तरूणांनी अ‍ॅक्ने फेशियल्सचा वापर करायला हवा. याचा वापर नियमितपणे तोपर्यंत करा, जोपर्यंत तुमच्या त्वचेशी संबंधित समस्या दूर होणार नाहीत.

ज्यांची त्वचा तेलकट आहे, त्यांनी कोरफड, काकडी, पपई, संत्रं यांच्या पेस्टचा वापर करणं हा खूप चांगला पर्याय आहे. जर तुम्ही यामध्ये निलगिरी, मोगरा, चंदन तेल मिसळलं तर याचा अधिक चांगला परिणाम दिसतो. 

उन्हाळ्याच्या दिवसात एक किंवा दोन वेळा डायमंड, पर्ल किंवा फ्रुट फेशियल अवश्य करायला हवं. हे सगळ्या प्रकारच्या त्वचेसाठी अत्यंत उपयुक्त ठरते. फेशियलच्या आधी नेहमी टी ट्री ऑइलचा वापर करा. 

तुम्ही जो फेस मास्क तयार करता त्यामध्ये कोरफडीचा वापर जरूर करा. ती थंड असल्यामुळे शरीराला गारवा मिळतो.

कोरड्या त्वचेसाठी केळ, द्राक्षं आणि कोरफडीची पेस्ट सर्वोत्तम ठरते.