पैसे योग्य ठिकाणीच खर्च करा

Sandyanand    05-Jun-2020
Total Views |

planning_1  H x


प्लानिंग करुन जर तुम्ही पैसा खर्च केलात तर तुमच्याकडे खूप सारी रक्कम शिल्लक राहू शकते. पण कुठे आणि कसा पैसा खर्च करायचा याची शिस्त लागणे महत्त्वाचे असते.


कोणत्याही बाबीसाठी नियोजनाची फार नितांत गरज असते. नियोजनाशिवाय कोणतीच गोष्ट सहजसाध्य होत नाही. तुम्हाला जर योग्य प्रमाणात पैसा मिळवायचा असेल, तो वाढवायचा असेल तर तेथेही नियोजन हे आवश्यकच असते. प्लानिंग करुन जर तुम्ही पैसा खर्च केलात तर तुमच्याकडे खूप सारी रक्कम शिल्लक राहू शकते. खर्च हा फायनांशिअल प्लानिंगचा महत्वपूर्ण हिस्सा आहे. पण कुठे आणि कसा पैसा खर्च करायचा याची शिस्त लागणे महत्त्वाचे असते. तुमच्याकडील शिल्लक रक्कम गुंतविल्यास खूप मोठा रिटायरमेंट प्लान तयार होऊ शकतो. त्यासाठी आपल्या प्रत्येक वैयक्तिक खर्चासाठी नियोजन करा. खर्चांची एक यादी तयार करा.

वस्तूंच्या महत्वानुसार त्यांना प्राथमिकता द्या. सर्वात महत्त्वपूर्ण खर्च यादीत वर राहतील. त्यापेक्षा कमी महत्त्वाचे खर्च असे अनूक्रमे लिहा. गुंतवणूक केल्यानंतर, विमा हप्ता दिल्यानंतर, कर्ज दिल्यानंतर आणि इतर आवश्यक बिलांचे पैसे दिल्यानंतर इतर गोष्टींवर खर्च करण्यासाठी तुमच्याकडे किती रक्कम उरते हे लिहून ठेवा.आता वरील यादीत सर्वात वर लिहिलेल्या वस्तूसाठी पैसे बाजूला काढून ठेवा. सर्वात खाली लिहिलेल्या वस्तूसाठी खर्च करणे गरजेचेच आहे का याचा विचार करा. तो खर्च टाळून ही रक्कम वाचवू शकता.  


जास्तीत जास्त पैसे वाचविण्यासाठी डिस्काऊंट ऑफर्सचा लाभ घ्या. एखाद्या वस्तूची ऑनलाईन किंमत जाणून घ्या. क्रेडिट कार्ड कॅशबॅक ऑफरचा लाभ घेण्याचा प्रयत्न करा. मोठी खरेदी करण्याचे आधी प्लानिंग करा व तसे पैसे साठवून ठेवा. उदा. मोठ्या कार्यासाठी, वास्तुशांती, विवाह, मुंज यासाठी एक वर्ष आधीपासूनच सेव्हिंग करायला सुरुवात करा. यामूळे तुम्हाला पैशांचे ओझे कमी वाटेल.त्याचप्रमाणे मोठ्या मुलांचे शिक्षण, त्यांचे विवाह यासाठी दरमहा थोडे सेव्हींग कराच. हा पैसा गुंतवल्यास अतिरिक्त व्याजही मिळेल आणि खर्च करण्यासाठी जास्त रक्कमही जमा होईल. असा छोट्या छोट्या बाबीतूनही तुम्ही पैशांचे फार मोठ्या चांगल्या प्रकारे नियोजन करू शकता.