गरीब देशांमधील लोकांच्या शारीरिक हालचाली जास्त

Sandyanand    05-Jun-2020
Total Views |


who_1  H x W: 0


श्रीमंत देशांमधील नागरिकांची आरोग्याबाबत अनास्था


जागतिक आरोग्य संघटनेने केलेल्या एका संशोधनात समजले की, श्रीमंत देशातील लोकांपेक्षा गरीब देशातील लोक अधिक शारीरिक श्रम, व्यायाम करतात. तर श्रीमंत देशातील लोकांमध्ये हे प्रमाण कमी आहे...


जगात असे अनेक देश आहेत, जे पैशांच्या बाबतीत तर श्रीमंत आहेत, पण आरोग्याविषयी बोलायचे झाले तर तितकेच गरीब आहेत. जागतिक आरोग्य संघटना (डब्ल्यूएचओ)ने नुकत्याच केलेल्या एका संशोधनात ही वस्तुस्थिती समोर आली की, संपन्नतेत पुढे असलेले देश शारीरिक श्रम करण्यात मागे पडत आहेत. आंतरराष्ट्रीय नाणे निधीच्या रँकिंगमध्ये ९व्या स्थानावर असलेल्या कुवेतची स्थिती अशी आहे की, ६७ टक्के लोकसंख्या शारीरिक श्रमांकडे लक्ष देत नाही. त्याचप्रमाणे सऊदी अरबची ५० टक्क्यांपेक्षा जास्त लोकसंख्या ऐशोआरामी आहे. श्रीमंत देशांच्या यादीत चौथ्या नंबरवर असलेल्या सिंगापूरची हीच स्थिती आहे. रिपोर्टनुसार जागतिक स्तरावर २००१ पासून शारीरिक हालचालींच्या पातळीवर कोणतीही सुधारणा झालेली नाही. 

 
जगभरात तीनपैकी एक महिला आणि चारपैकी एक पुरुष आरोग्यसंपन्न राहण्यासाठी सक्रिय राहत नाहीत. डब्ल्यूएचओच्या या संशोधनात मुख्य संशोधक रेजिना गुथोल्ड यांनी सांगितले की, 'इतर प्रमुख जागतिक स्तरावर आरोग्यविषयक धोके असले तरीही जगभरात अपुऱ्या शारीरिक हालचालींचा स्तर सरासरीइतका पुरेसा नाहीये. सर्व प्रौढांमध्ये एक चतुर्थांश लोक अधिक चांगल्या आरोग्यासाठी शारीरिक हालचालीच्या ठरलेल्या पातळीपर्यंत पोहोचू शकत नाहीत. 

WHO च्या आकडेवारीनुसार 
जगातील २७.५% लोकसंख्या शारीरिक श्रम करत नाही. 
२३.४% पुरुष आळशी असतात. 
३१.७ टक्के महिला आळशी असतात. 

४ पैकी एक पुरुष शारीरिक श्रम करत नाही 
३ पैकी एक महिला शारीरिक श्रम करत नाही

किती वयात किती व्यायाम हवा?
५-१७ वयोगटाला  ६० मिनिटे रोज कमीत कमी 
१८-६४ वयोगटाला १५० मिनिटे आठवड्यात कमीत कमी 

हे व्यायाम प्रकार ठेवतील आरोग्यसंपन्न
वेगाने चालणे. सायकल चालविणे. बागेतील गवत स्वत: कापणे. टेनिस, बॅडमिटन किंवा इतर काही खेळ खेळा. योग करा. पोहणे शिका.

जगात वाढते धोके
जगात मधुमेहाच्या तडाख्यात ४२.२ कोटी लोक सापडले आहेत. 
२०३० पर्यंत मृत्यूसाठी पहिल्या ७ कारणांमध्ये मधुमेह सामील होईल. 
३८.२ टक्के अमेरिकी लोक लठ्ठपणाची शिकार आहेत.
३१ टक्क्यांपेक्षा जास्त अमेरिकी मुलांमध्येही लठ्ठपणाची शक्यता