चप्पल वा बूट वापरून पाय आकर्षक कसे करता येतील?

Sandyanand    05-Jun-2020
Total Views |

sandal_1  H x W


रंगीत, डिझाइनर चप्पलमुळे आपल्या व्यक्तिमत्त्वाचा एक वेगळाच प्रभाव पडतो. चप्पलच्या डिझाइनचा एक वेगळाच परिणाम आपल्या पायांवर होत असतो. गडद, भडक किंवा पांढरा रंग लक्ष वेधून घेण्याचं काम करतो. म्हणून जर तुम्ही तुमच्यासाठी चप्पल खरेदी करण्यासाठी जात असाल तर अशा रंगांची निवड करा, जे आकर्षक दिसतील. म्हणजे काळा किंवा इतर नैसर्गिक रंग भलेही दिसायला साधारण दिसतील, पण त्यांची बनावट खूप सुंदर दिसते. 


मोठ्या किंवा बारीक पायांसाठी अशा चप्पलेची निवड करा ज्याचा पुढील भाग टोकदार असेल. शक्यतो बक्कल किंवा बटण असणाऱ्या चप्पलची निवड करू नका. बूटांची खरेदी करताना नेहमी विरोधी रंगातील चप्पलची निवड करा. जी अंगठ्याच्या बाजूला निमुळती आणि हिलही त्यानुसारच असेल. कडक टाचा असणाऱ्या व्यक्तींनी खूप उंच आणि खूप फ्लॅट चप्पल, बूट किंवा सँडल घालता कामा नये. सगळ्यात क्लासिक चप्पल त्या असतात ज्या पुढून अर्धगोलाकार असतील आणि थोडेसे निमुळते असतील. तर मधून चौकोनी कट असेल. छोट्या मुलांच्या चप्पल जेवढ्या रूंद, मोकळ्या अणि हलक्या असतील तेवढ्या क्युट दिसतात. मुलांना अशाच चप्पल घाला.  

जर तुमचा पाय खूप बारीक असेल तर तुम्ही स्टॉकिंग घालू शकता. त्यासाठी तुम्ही एक उपाय आजमावू शकता. एक नवीन बूट घ्या, ते स्वच्छ करा. त्यावर उत्तम पावडर किंवा पेंटिंग ट्यूबच्या माध्यमातून रेषा काढा. त्यानंतर तिरक्या रेषा काढा किंवा अशाच डिझाइनचे बूट खरेदी करा. बुटांना असणारी डिझाइन किंवा त्यांची निर्मिती यानुसार स्टॉकिंग घाला. अशा प्रकारच्या डिझाइनमुळे तुमच्या पायांना सुरक्षितता मिळेलच असं नाही पण हे दिसायला चांगले दिसतील, हे नक्की. फॅशननुसार, हवामाननुसार चप्पलची निवड करायला हवी.


sandal_2  H x W


फॅशनच्या मान्यतेनुसार, बुटांची बनावट, रंग, डिझाइन, त्यामध्ये वापरलेलं चामडं खूप महत्त्वाचं ठरतं. सध्या पातळ चामड्याच्या क्लासिक शूजना अधिक पसंती दिली जाते. त्यामध्ये हिल शिवलेली किंवा जॉइंट असते. तसंच ती विरूद्ध रंगात असते. फॅशनचा विचार जरूर करावा, पण कधीही अशा शूजची निवड करू नका, जे एक-दोनदा घातले जातील, नंतर ते कचऱ्याच्या डब्यात जातील. कडक, व्यवस्थित न बसणाऱ्या चप्पल कधीही घेऊ नका. हाय फॅशनसाठी फिकट रंगाच्या चप्पलची निवड कधीही करू नका. कारण त्या थोड्याच दिवसात खराब झाल्यासारख्या दिसतात. मागच्या बाजूने ओपन असणारे सँडल कोणत्याही ड्रेसवर खूप छान दिसतात. तसेच ते घालण्यासाठी अत्यंत सुविधाजनक असतात. यामध्ये कांस्य, जस्त, तांबं हे रंग अधिक आकर्षक दिसतात. चप्पलचा मुख्य उद्देश चालणं आरामदायक करणं हा आहे, त्यामुळे अशाच चप्पलची निवड करा ज्यामुळे चालणं सुविधाजनक होईल आणि पाय, पाठ, कंबर यांच्या समस्या निर्माण होणार नाहीत.