सेलिब्रिटी टॉक्स राजू श्रीवास्तव

04 Jun 2020 12:19:14



मी मुंबईत १९८२ ला पोहोचलो आणि १९८७ पर्यंत मला हे जाणवू लागलं होतं, की आता आपलं काहीतरी हवं. आपली एक शैली असायला हवी, नाहीतर मी इतिहासजमा होऊन जाईन. त्याचदरम्यान मी 'शोले' चित्रपटावर आधारित माझा आयटम तयार केला आणि त्याला खूपच प्रसिद्धी मिळाली. कुणाचीही नक्कल न करता मी तयार केलेला तो पहिलाच असा आयटम होता. 

तो काळ असा होता की, चित्रपट वगैरे गोष्टी दुय्यम झाल्या आणि लाईव्ह शो, नकलांचे कार्यक्रम, हेच मुख्य काम सुरु झालं. सुरुवातीला तर मला ज्युनिअर अमिताभ बच्चन म्हणून काम मिळत होतं. पण, काही वर्षातच लक्षात आलं की, लोकांच्या आवाजाच्या नकला करून आपण किती दिवस तग धरू शकणार? त्यामुळे आपलं काहीतरी हवं, असा विचार डोकावू लागला होताच. कानपूरमध्ये असतानाच साधारणपणे १९८२ च्या आसपास मी हा विचार केला होता की, 'मुंबईला गेलं पाहिजे..' म्हणजे, संघर्षाच्या काळात घरातून पैसे येत राहतील, असं होऊ नये, म्हणून मी ऑर्केस्ट्रामध्ये काम करायचा निर्णय घेतला होता. 

मी अभिनेते, नेत्यांच्या नकला करतो, त्यांचे आवाज काढू शकतो, तर कुठे ना कुठे काम तर नक्कीच मिळेल, असा अंदाज होता. तेव्हाचं नियोजन असं होतं की, रात्री ऑर्केस्ट्रात काम करायचं, त्यातून पैसे मिळतील. दिवसभर मी चित्रपटात काम मागण्यासाठी लोकांना भेटत राहीन. खूप वर्षं हे सुरू होतंच. त्यात अचानकच २००५ मध्ये 'लाफ्टर चॅलेंज' नावाचा कार्यक्रम आला आणि त्यानं धमाल उडवून दिली. त्या कार्यक्रमानं खूपच प्रसिद्धी मिळवून दिली. माझ्या नकलांच्या कॅसेटस् बाजारात आल्या होत्या.

Powered By Sangraha 9.0